शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शासकीय इमारतीला जुनीच घरपट्टी ; लाखोंचा महसूल बुडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:27 IST

महापालिकेच्या वतीने महसुलात वाढ व्हावी यासाठी सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी भरमसाठ दरवाढ लागू करण्यासाठी आटापिटा सुरू आहे.

सिडको : महापालिकेच्या वतीने महसुलात वाढ व्हावी यासाठी सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी भरमसाठ दरवाढ लागू करण्यासाठी आटापिटा सुरू आहे. परंतु दुसरीकडे सिडकोतील एका शासकीय इमारतीला गेल्या पाच वर्षांपासून जुनीच घरपट्टी सुरू असल्याने यातून मनपाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना याकडे मात्र डोळेझाक केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केली जात आहे.  महापालिकेच्या वतीने सिडको भागात व्यावसायिक तसेच घरघुती अशा सुमारे साठ ते सत्तर हजार मिळकतींना दरवर्षी घरपट्टी दिली जाते. यासाठी मुदतीच्या आत पैसे न भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दंडात्मक नोटीस बजावण्यात येते. तसेच वेळप्रसंगी त्यांच्या घरांचा लिलावदेखील करण्यात येतो. यातच आता मनपाने घरपट्टीत तब्बल सुमारे १८ टक्के करवाढ लागू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सिडको ही कामगार वसाहत म्हणून ओळखली जात असून एकदम घरपट्टीत भरमसाठ वाढ करण्यास सिडकोवासीयांनी विरोध दर्शविला आहे. एकीकडे मनपाकडून महसुलाच्या माध्यमातून तिजोरीत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी संबंधित विभागाच्या गलथान व नियोजनशून्य कारभारामुळे मात्र जुन्या सिडकोतील कामगार कल्याण मंडळ संलचित ललित कला भवन या इमारतीला गेल्या पाच ते सहा वर्षांपासून जुनीच घरपट्टी लागू असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ललित कला भवन पूर्वी कमी जागेत होते, परंतु सदरची जागा ही कमी पडत असल्याने त्याचे विस्तारीकरण करण्यात आले. गेल्या २४ फेबु्रवारी २०१३ रोजी या भवनाचा लोकार्पण सोहळा त्यावेळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व आदिवासी विकास कामगार मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या भवनाचा लोकार्पण सोहळा होऊन तब्बल पाच ते सहा वर्षांचा कालावधी उलटला असला तरी अजूनही या इमारतीला जुनीच घरपट्टी लागू असल्याचे समजते.महापालिकेचा अजब कारभारमनपाच्या वतीने सिडको भागातील सर्वसामान्य नागरिकांनी घरपट्टी न भरल्यास त्यांच्यावर मिळकत जप्तीची कारवाई केली जात असली तरी दुसरीकडे मात्र सिडकोतील शासकीय इमारतीकडे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून जुनीच घरपट्टी सुरू आहे. यामुळे मनपाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याने याबाबत मनपाची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका