शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जुने नाशिक गावठाणचा क्लस्टरअंतर्गत होणार विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 21:02 IST

देवयानी फरांदे : मुंबईत झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता

ठळक मुद्दे नगरविकास विभागास त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना योजनेत सहभागी होणा-या जमीन मालकांना वाढीव एफएसआय देण्याची तरतूद

नाशिक - मध्य विधानसभा मतदारसंघातील जुने नाशिक गावठाण परिसराचा क्लस्टर अंतर्गत (समूह विकास धोरण) विकास करण्यास शासनाने तत्वत: मान्यता दिली असून त्याबाबत नगरविकास विभागास त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना गुरुवारी (दि.८) मंत्रालयात झालेल्या बैठकीत अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी संबंधित अधिका-यांना दिल्याची माहिती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली आहे.नाशिक मध्य विधानसभा क्षेत्रातील जुने नाशिक भागाचा (गावठाणचा) विकास होण्यासाठी देवयानी फरांदे प्रयत्नशिल आहेत. जुने नाशिकच्या गावठाणच्या विकासावर चर्चा करण्यासाठी यापूर्वी दोन वेळा तहकुब झालेली बैठक गुरुवारी (दि.८) मंत्रालयात झाली. यामध्ये गावठाण क्लस्टरसाठी नागपूरच्या धर्तीवर नाशिक शहरासाठीही स्वतंत्र नियमावली मंजूर करण्याचे मान्य करण्यात आले तसेच यासदंर्भात नगरविकास विभागामार्फत त्वरीत कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या. महापालिका आयुक्तांमार्फत गावठाणातील समुह विकासाबाबत स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याच्याही सुचना देण्यात आल्या. यामुळे कमी क्षेत्रातील दोन ते चार जागा मालक एकत्र येवून समुह विकास करु शकतील. या विषयाबाबत शासनामार्फत सकारात्मक धोरणाची मंजूरी नजीकच्या काळात दिली जाणार आहे. या योजनेत सहभागी होणा-या जमीन मालकांना वाढीव एफएसआय देण्याची तरतूद अंतर्भूत असणार आहे अथवा इतर विविध फायदे देण्यात येणार आहेत. यामुळे गावठाणचा विकास झपाटयाने होवू शकेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीला नगरविकास खात्याचे प्रधान सचिव नितिन करीर, जलसंपदा सचिव च.अ.विराजदार, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.बी.डी.पवार, मनोहर ठोंबरे, नगरविकासचे उपसचिव संजय सावजी, शं.त्र.जाधव, नियोजन व जलविज्ञानचे मुख्य अभियंता दि.रा.जोशी, मेरीचे महासंचालक राजेंद्र पवार तसेच व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण, जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन, सिडकाचे प्रशासक झोपे, मनपाचे शहर अभियंता उत्तम पवार, महापालिकेचे सहा.संचालक नगररचना आकाश बागुल आदी उपस्थित होते.तुकाराम मुंढेंची उपस्थितीमंत्रालयात झालेल्या या बैठकीला महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही उपस्थिती लावली. बुधवारी (दि.७) तुकाराम मुंढे यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांनी मंत्रालयात झालेल्या या बैठकीला हजेरी लावत चर्चेत सहभाग नोंदविला. त्यामुळे जुने नाशिक गावठाणाच्या विकासाच्या चर्चेपासून मुंढे यांनी आपल्या कामाचा श्रीगणेशा केला आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका