शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ओझर ग्रामपालिकेची धडक वसुली मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 21:24 IST

ओझर : येथील ग्रामपालिका मालकीच्या जागेवर भाडेतत्त्वावर असलेल्या काही व्यावसायिक गाळेधारकांवर वाढलेल्या थकबाकीमुळे प्रशासनाने कारवाईचे हत्यार उपसले.  थकबाकीमुळे ग्रामपालिका ...

ओझर : येथील ग्रामपालिका मालकीच्या जागेवर भाडेतत्त्वावर असलेल्या काही व्यावसायिक गाळेधारकांवर वाढलेल्या थकबाकीमुळे प्रशासनाने कारवाईचे हत्यार उपसले.  थकबाकीमुळे ग्रामपालिका अनेक वर्षांपासून काही गाळेधारकांना वसुली करण्याचा तगादा लावत होती. त्यात अनेकांनी येऊन ती भरली. शेवटी उरलेल्या ३७ गाळेधारकांना ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकर यांनी पंधरा दिवसांपूर्वी नोटिसा बजावल्या. त्यास २९ जणांनी सकारात्मक प्रतिसाद देत थकबाकी जमा केली. उरलेल्या आठ जणांवर गुरुवारी सकाळी देवकर यांनी आपला मोबाइल बंद करून कर्मचाऱ्यांसोबत घेऊन कारवाई करायला सुरुवात केली. त्यात मटण मार्केट येथील पाच, प्रियदर्शनी येथील एक, तर खंडेराव मंदिराजवळील दोन अशा आठ गाळ्यांना सील केले. याप्रसंगी काही भाडेकरूंची प्रशासनाबरोबर बाचाबाची झाली. देवकर यांनी ठाम पवित्रा घेतल्याने सील झालेल्या दुकानदारांनी एकूण चार लाख दहा हजार रुपये भरले. नंतर सगळ्यांची दुकाने उघडण्यात आली. यासर्व प्रकरणी दुपारनंतर ओझर शहरात एकच चर्चा घडली. या कारवाईत दिलीप ठुबे ,संतोष सोनवणे ,योगेश गोरे, तुकाराम गवळी, सतीश सोनवणे, योगेश गोरे यांच्यासह ग्रामपालिका कर्मचारी सहभागी झाले होते.----मार्च एण्डला कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर ग्रामपालिकेची आर्थिक स्थिती त्यावेळी केलेल्या उपाययोजनामुळे काहीशी बिघडली. आज उत्पन्नाचे स्रोत कर असताना अनेक लोक ते भरण्यास टाळाटाळ केली होती. काही दिवसांत पाणी आणि घरपट्टी वसुलीसाठीदेखील अशीच वसुली मोहीम हाती घेणार आहे.-दत्तात्रय देवकर, ग्रामविकास अधिकारी,ओझर

टॅग्स :Nashikनाशिक