शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते ओहोळ यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:37 IST

दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि रा. सु. गवई यांचे विश्वासू सहकारी दलितमित्र डॉ. एस. जी. ओहोळ (८६) यांचे बुधवारी (दि.२८) सकाळी ७.३० वाजता अकस्मात निधन झाले.

नाशिक : दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि रा. सु. गवई यांचे विश्वासू सहकारी दलितमित्र डॉ. एस. जी. ओहोळ (८६) यांचे बुधवारी (दि.२८) सकाळी ७.३० वाजता अकस्मात निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी दसक येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.उपनगर येथे त्यांचे वास्तव्य होते. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील फाळणे हे त्यांचे मूळ गाव. नोकरीनिमित्त ते ठाण्याला आले आणि तेथूनच चळवळीशी ते जोडले गेले. मुंबईत त्यांनी स्मॉल स्केल इंडस्ट्रीयल अ‍ॅन्ड जनरल वर्कस फेडरेशनची स्थापना केली. या फेडरेशनचे अधिवेशन त्यांनी यशस्वी करून दाखविल्यानंतर ते अधिक चर्चेत आले. १९६५ मध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या भूमिहीन सत्याग्रह आंदोलनातील २०२ सत्याग्रहींचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले. या आंदोलनात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. नामांतर चळवळतही त्यांचा लक्षणीय सहभाग होता.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष रा. सू. गवई यांच्याबरोबर ते १९८५ मध्ये संपर्कात आले. गवई यांच्याबरोबर त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. रिपाइं गवई गटाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तसेच उत्तर महाराष्टÑ अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. अखेरच्या श्वासापर्यंत ते गवई गटातच राहिले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साहित्य संपदा आणि बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार यासाठी त्यांनी देशभरात अनेक प्रदर्शने भरविली. दलितांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला. अनेक शासकीय आणि अशासकीय समित्यांवर त्यांनी काम केले. १९९५ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने दलितमित्र पुरस्कार देऊन गौरविले.

टॅग्स :Deathमृत्यूNashikनाशिक