शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
4
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
5
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
6
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
7
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
8
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
9
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
10
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
11
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
12
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
13
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
14
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
15
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
16
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
17
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
18
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
19
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
20
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

By admin | Updated: February 28, 2017 01:49 IST

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगत राज्याचे शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

 नाशिक : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात प्रगती होत असून नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ व निफाड यांसारख्या तालुक्यांमध्ये अप्रगत शाळांमध्ये वाढ होत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शासनाकडून विविध प्रयत्न करूनही त्यात सुधारणा होत नसल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगत राज्याचे शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी केंद्रप्रमुख व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. रावसाहेब थोरात सभागृहात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विभागीय शिक्षण परिषद पार पडली. याप्रसंगी आयुक्त बोलत होते. व्यासपीठावर प्राथमिक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे मुख्य सचिव नंदकुमार यांच्यासह शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव आदि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. धीरजकुमार म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी राज्यात विविध उपक्र म राबविले जात असतानाही बहुतांश शाळांमध्ये सुधारणा दिसून येत नाही. त्यासाठी शिक्षकांनी टेक्नोसॅव्ही होत स्वत: उपक्रमशील होणे गरजेचे आहे. राज्यातील १९ हजार शाळा या डिजिटल झाल्या असून, अन्य शाळाही डिजिटल होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्राथमिक स्तरावरून जिल्हा पातळीवरील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या कर्तव्यनिष्ठेने पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच बीट, केंद्र, जिल्हा तसेच राज्य पातळीवर एखाद्या विद्यार्थ्यास लिहिता, वाचता न आल्यास त्याची जबाबदारीही संबंधित विभागाने घेणे गरजेचे असून, राज्यातील सर्व शाळा या शंभर टक्के प्रगत होणे आवश्यक असल्याचेही मत धीरजकुमार यांनी व्यक्त केले. दरम्यान, बीट, केंद्रावर दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित असताना बहुतांश शिक्षक, तसेच काही अधिकारी शिक्षणाच्या दर्जापेक्षा बदलीचे अधिक अर्ज घेऊन येतात. त्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित केल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत तसेच देशाच्या प्रगतीत हातभार लागेल, असे सांगतानाच प्रशस्त भागात बदली मागणाऱ्या शिक्षकांची यावेळी त्यांना कानउघाडणी केली. (प्रतिनिधी)