शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

प्लॅस्टिकबंदीबाबत  अधिकाºयांनी व्यापक जनजागृती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:53 IST

संपूर्ण राज्यात गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी केली जाणार आहे. केवळ वापरावरच नव्हे तर निर्मिती आणि खरेदी-विक्रीही कायद्यानुसार बंद केली जाणार असल्याने या बंदीबाबत अधिकाºयांनी व्यापक जनजागृती मोहीम राबविली पाहिजे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले.

नाशिक : संपूर्ण राज्यात गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी केली जाणार आहे. केवळ वापरावरच नव्हे तर निर्मिती आणि खरेदी-विक्रीही कायद्यानुसार बंद केली जाणार असल्याने या बंदीबाबत अधिकाºयांनी व्यापक जनजागृती मोहीम राबविली पाहिजे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले.  नाशिकरोड येथील जलविज्ञान संशोधन प्रबोधिनी येथे पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि पर्यावरण विभागाचे सचिव सतीश गवई तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अलबन्नग, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन आदी उपस्थित होते. प्लॅस्टिकबंदी धोरण राबविण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कदम म्हणाले, केवळ शासनाने निर्णय घेऊन चालणार नाही, त्यात लोकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. प्लॅस्टिकमुक्त समाज निर्माण करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रत्येक विभागाने प्लॅस्टिकमुक्तीच्या योजना, उपक्रम राबविले पाहिजे. काही अभिनव कल्पना असतील तर त्यांचा अवलंब केला पाहिजे. विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला पाहिजे. प्लॅस्टिकचे काय दुष्परिणाम होतात याबाबत समाजातील प्रत्येक घटकाला  जाऊन सांगितले पाहिजे. त्यांनाही प्लॅस्टिकबंदी मोहिमेची माहिती करून दिली पाहिजे, असेही कदम म्हणाले.  प्लॅस्टिकबंदी करताना सर्व अधिकाºयांच्या सूचना आणि दृष्टिकोन जाणून घेतला जात आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच कायदा आहे की जो विधिमंडळात संमत होण्यापूर्वी नागरिकांकडून त्याबाबतची मते जाणून घेतली जात आहेत. सर्वसाधारणपणे कायदा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी व्हावी असे अपेक्षित असते; परंतु बंदी कशी असावी आणि उपायोजना काय हव्यात या सूचना अधिकारी, सर्वसामान्यांकडून घेण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे आपण या कायद्याचा भाग आहोत याची जाणीव सर्वसामान्यांना होऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी ते प्रोत्साहित होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.  निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकानेच प्लॅस्टिकबंदीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. बंदी लागू करताना कोणताही राजकीय पक्ष, व्यक्ती आडवी येत असेल तर नियमानुसार शासकीय कामात अडथळा आणला म्हणून त्याच्यावर कारवाई करण्याचा सल्लाही त्यांनी अधिकाºयांना दिला. काचेचे ग्लास, फुलांचा गुच्छ प्लॅस्टिकबंदी धोरण ठरविण्यासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्रिमहोदय, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्यांच्या टेबलवर काचेचे ग्लास आणि जग ठेवण्यात आले होते. फुलांचे गुच्छ देताना त्यावर प्लॅस्टिकचे पारदर्शक कव्हर जाणीवपूर्वक टाळण्यात आले होेते. निसर्गाची अवकृपा राज्यातील शेतकरी ज्या कारणांनी आत्महत्या करतो त्यातील एक कारण म्हणजे निसर्गाची अवकृपा हेही लक्षात घेतले पाहिजे, असे कदम म्हणाले. आपण निसर्गाचा समतोल राखत नसल्याने निसर्गसाखळी बदलली आणि त्याचा परिणाम शेती आणि शेतकºयांवर झाला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण संवर्धन झाले पाहिजे, असेही कदम म्हणाले. एक दिवस पर्यावरणासाठी प्लॅस्टिकबंदी तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाºया विविध उपाययोजना आणि घेण्यात आलेले निर्णय यांची अंमलबजावणी होते की नाही याचा आढावा घेण्यासाठी अधिकाºयांनी आठवड्यातील एक दिवस केवळ पर्यावरणासाठी राखून ठेवला पाहिजे, अशी सूचना रामदास कदम यांनी केली. यादिवशी केवळ पर्यावरणीय कामाचा आढावा घेतला पाहिजे, असेही सुचविले. तसेच प्लॅस्टिकमुक्त शाळांचा गौरव करण्याचीही सूचना त्यांनी मांडली.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीRamdas Kadamरामदास कदम