शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

महात्मा फुले यांना आदरांजली अर्पण

By admin | Updated: November 28, 2014 22:55 IST

पुण्यतिथी : शाळा-शाळांमध्ये महात्मा जोतिबा फुले यांचे स्मरण

नाशिक : महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात विविध ठिकाणी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. शाळांमध्ये आदरांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.अभिनव बालविकास मंदिरमराठा विद्या प्रसारक समाजाचे अभिनव बालविकास मंदिर या शाळेत महात्मा जोतिराव फुले यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्याध्यापक मीनाक्षी गायधनी व वैशाली देवरे तसेच ज्येष्ठ शिक्षक शोभा गायकवाड, कारभारी तांदळे, ज्योती पवार यांच्या हस्ते महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी सर्व शिक्षक उपस्थित होते. रूपाली जाधव यांचे भाषण झाले. सूत्रसंचालन पौर्णिमा पगार यांनी केले.सागरमल मोदी विद्यालयना. ए. सोसायटी संचलित सागरमल मोदी विद्यालयात महात्मा जोतिराव फुले यांची स्मरण करण्यात आले. मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी जयश्री दोंदे, सौ. उज्ज्वला कासार उपस्थित होते. शाळेतील कल्पेश मासरे हा विद्यार्थी जोतिरावांच्या पोषाखात कार्यक्रमात सहभागी झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी जोतिरावांच्या जीवनावरील अनेक प्रसंग विशद केले. सूत्रसंचालन नेत्रा साने या विद्यार्थिनीने केले. प्रीती पालवे या विद्यार्थिनीने आभार मानले. कार्यक्रमास अशोक शिरुडे, श्रीराम ठाकरे, श्रीमती शोभा ठाकूर, सौ. कल्पना उदावंत, सौ. उषा जोपळे उपस्थित होते.श्री श्यामलाल गुप्ता हिंदी प्राथमिक विद्यालयश्री श्यामलाल गुप्ता हिंदी प्राथमिक विद्यालय, श्रमिकनगर विद्यालयात शिक्षणमहर्षी महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक एस. एस. बिरारी यांच्या हस्ते प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वसुधा पोफळे, गीतांजली सोनवणे यांची भाषणे झाली.इंदिरा गांधी विद्यालयसातपूर-शिवाजीनगर येथील इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या १२४ वी पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण नवले होते. नवले यांनी फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक अरुण नवले यांनी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या समाजासाठी असलेल्या योगदानाबद्दल आणि शैक्षणिक क्रांतीबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता देवरे यांनी केले. यावेळी उज्ज्वला पवार, उषा गाडे, सविता सातभाई, ज्योती कापडे, रूपाली अहेर, वैशाली बिडगर, वृषाली पाटोळे, सोनाली पोरजे, कैलास जाधव, सीताराम धुर्जड आदि शिक्षक उपस्थित होते.सरस्वती विद्यालयदि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित सरस्वती विद्यालय मराठी माध्यम कामटवाडे येथे महात्मा फुले पुण्यतिथीदिनी अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक सुगंधा सोनवणे, शिल्पा भामरे, कांचन अलाणे यांनी जोतिबांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल चोथे यांनी केले.न्यू मराठा हायस्कूलमविप्र समाजाचे न्यू मराठा हायस्कूलमध्ये महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी मुख्याध्यापक सी. टी. साळवे, केटीएचएम कॉलेजचे प्राध्यापक ए. बी. सोनवणे, पी. टी. भागवत, एम. एन. सोमवंशी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. एस. एस. संगमनेरे यांनी आभार मानले.वाघ गुरुजी शाळावाघ गुरुजी बालशिक्षण मंदिर शाळेत महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक मंदाकिनी सोनवणे यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राजोळे यांनी फुले यांची जीवनचरित्रपर माहिती सांगितली. काही विद्यार्थी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत उपस्थित होते. सूत्रसंचालन शीला थेटे यांनी केले. कार्यक्रमास रंजना घुले, कल्पना पाटील, मनीषा जाधव, मंगला गुळे, वैशाली मोरे, माई खैरनार, मीनाक्षी ठाकरे, सीमा भामरे, कविता आगळे, मोहिनी निंबाळकर, रंजना बर्वे, पूनम कदम, दिलीप पाटील, नानासाहेब पाटील, बाळासाहेब पवार आदि शिक्षक उपस्थित होते.