निफाड : द्राक्ष व्यापाऱ्याने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे ६३ लाख १० हजार ७३१ रु पये न देता पलायन केल्याचा प्रकार निफाड तालुक्यात घडला. या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात व्यापारी, त्याचा लेखनिक व व्यापाऱ्याच्या पलायनास मदत करणाऱ्या स्थानिक नागरिकाविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निफाड पोलीस ठाण्यात गाजरवाडी येथील मच्छिंद्र कारभारी सालके या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, उगाव येथे व्यापारासाठी आलेल्या कोलकाता येथील द्राक्ष व्यापारी मोहम्मद शरिफ हा बीएमडब्ल्यू या नावाने द्राक्ष व्यापार करत होता. त्यास विक्र ी केलेल्या द्राक्षमालाचे पैसे घेण्यापोटी दिलेले २ दोन लाख ४० हजार आणि ३१ हजाराचे धनादेश असे एकूण २ लाख ७१ हजाराचे धनादेश न वटल्याने त्याच्याकडे पैसे मागण्यासाठी १५ मार्च रोजी उगावला गेलो असता त्याठिकाणी अनेक शेतकरी जमलेले होते. त्यांनी द्राक्ष व्यापारी मोहम्मद शरिफ, मुनिम मोहम्मद फैयाज यांच्याकडे द्राक्षमालाच्या पैशाची मागणी केली. त्यावेळी बबलू पानगव्हाणे याने व्यापारी मोहम्मद शरिफ याच्याबरोबर चहा पिऊन येतो, पैशांची व्यवस्था करतो असे सांगून व्यापाऱ्यास घेऊन गेला. त्यानंतर व्यापाऱ्याने पलायन केल्याने फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी निफाड पोलिसांनी द्राक्ष व्यापारी मोहम्मद शरीफ, त्याचा मुनिम मोहम्मद फैयाज, बबलू पानगव्हाणे या तिघांविरु द्ध गुन्हा दाखल केला असून, यातील व्यापाऱ्याचा मुनिम मोहम्मद फैयाज यास पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (वार्ताहर)यांची झाली फसवणूकआनंदा शंकर नागरे (डोंगरगाव) ३ लाख ८८ हजार ७३१, सुरेश काशीनाथ गायकवाड (पारेगाव, ता. चांदवड) ४ लाख १७ हजार, चंद्रभान रमेश कुशारे (सावरगाव) ४ लाख ९० हजार, हरी दामू गावित (पारेगाव, ता. चांदवड) १ लाख ८७ हजार, कैलास यादव (मालसाणे) ३ लाख ८५ हजार, शहाजी रघुनाथ भुजाडे (कन्हेवाडी, ता. चांदवड) १ लाख ५० हजार, शिवाजी कचरू भुजाडे (कन्हेरवाडी) १ लाख ४० हजार, विजय गणपत पडोळ (सोनेवाडी) १ लाख ९७ हजार, नवनाथ रामनाथ निमसे (नांदूर) ४ लाख १७ हजार, भाऊसाहेब देवराम कवडे (वाकी, ता. चांदवड) ४० हजार, रंगनाथ पुंजाराम कहांडळ (सोग्रस, ता. चांदवड) ४ लाख ७७ हजार, प्रवीण सुधाकर गुऱ्हाळे (पालखेड, ता. निफाड) ३ लाख ६८ हजार, राजेंद्र वाल्मीक केकाळ (पुरी, ता. चांदवड) ७ लाख २१ हजार, रावसाहेब वाळू भोसले (सारोळे खुर्द) २ लाख ९७ हजार, धोंडीराम मनोहर दाते (गाजरवाडी) ५० हजार, सुरेश देवराम कुंवर (नवापूर, ता. चांदवड) १ लाख ३८ हजार, मधुकर दत्तू शिंदे (देवरगाव) ४ लाख ४५ हजार, सुखदेव नामदेव मोरे- ३ लाख ७० हजार, महेश तात्याबा कहांडळ (शिलापूर) ३ लाख २४ हजार, धोंडीराम संतू कहांडळ (शिलापूर) ६५ हजार असे २१ शेतकऱ्यांचे ६३ लाख १० हजार ७३१ रु पयांच्या द्राक्षमालाचे पैसे न देता या व्यापाऱ्याने पलायन केले आहे.
तिघांविरु द्ध गुन्हा : मुनिमाला पोलीस कोठडी
By admin | Updated: March 16, 2017 23:46 IST