शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:21 IST

देवस्थान जमिनीवर कूळ लावण्याची तरतूद नसतानाही कुळाची नोंद करून त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थानाची सुमारे दोनशे कोटी रुपयांची जमीन परस्पर बांधकाम व्यावसायिकाला विक्री केल्याप्रकरणी अखेर त्र्यंबक पोलिसांत तत्कालीन तहसीलदार, प्रांत अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी या महसूल खात्याच्या अधिकाºयांसह बांधकाम व्यावसायिक सचिन दप्तरे व अन्य अशा २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जमीन घोटाळ्यात गुन्हा दाखल होण्याच्या शक्यतेने संंबंधित सर्वच संशयित फरार झाले आहेत.

नाशिक : देवस्थान जमिनीवर कूळ लावण्याची तरतूद नसतानाही कुळाची नोंद करून त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थानाची सुमारे दोनशे कोटी रुपयांची जमीन परस्पर बांधकाम व्यावसायिकाला विक्री केल्याप्रकरणी अखेर त्र्यंबक पोलिसांत तत्कालीन तहसीलदार, प्रांत अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी या महसूल खात्याच्या अधिकाºयांसह बांधकाम व्यावसायिक सचिन दप्तरे व अन्य अशा २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जमीन घोटाळ्यात गुन्हा दाखल होण्याच्या शक्यतेने संंबंधित सर्वच संशयित फरार झाले आहेत.  गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये त्र्यंबकेश्वरचे तत्कालीन प्रांत रामसिंग सुलाने, तहसीलदार रवींद्र भारदे, मंडळ अधिकारी नंदकिशोर बिरारी व तलाठी बी. एम. हांडोरे यांचा समावेश आहे. त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थान व गंगाद्वार ट्रस्टच्या मालकीच्या सुमारे १८५ एकर इनामी जमिनीवरील कूळ शासन व धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता बदलले गेले व महसूल अधिकाºयांनी बांधकाम व्यावसायिक सचिन दिनकर दप्तरी यांचे नाव सातबारा उताºयावर कूळ म्हणून लावले. यासंदर्भात शिवसेनेच्या आमदार तृप्ती सावंत यांनीअधिवेशनात तारांकित प्रश्न  उपस्थित केल्यावर त्याचे उत्तर देताना कागदपत्र तपासणीतून विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या निदर्शनास ही बाब आली. देवस्थानची जमीन धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय विक्री करता येत नाही तसेच शासनाने संबंधित देवस्थानाला सदरची जमीन इनाम म्हणून दिलेली असताना त्यावर कुळाचे नाव लावता येत नसतानाही देवस्थानाने जमिनीची परस्पर बेकायदेशीर विक्री केल्याने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश झगडे यांनी जिल्हाधिकाºयांना दिले होते. त्यावर जिल्हा प्रशासनाने टाळाटाळ चालविली होती. परंतु अधिवेशनाच्या तोंडावर हा मुद्दा उपस्थित झाल्याने अखेर शनिवारी रात्री उशिरा त्र्यंबकेश्वरचे नायब तहसीलदार एस. एम. निरगुडे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. यात देवस्थानचे मूळ वहिवाटीदार प्रभाकर शंकर महाजन यांनाही आरोपी करण्यात आले आहे.  कोट्यवधी रुपयांची देवस्थान जमिनीच्या या घोटाळ्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले होते. त्यामुळे शनिवारी गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी फरार झाले आहेत.प्रांतांकडे सुनावणीया प्रकरणात प्रांत अधिकारी राहुल पाटील यांनी पुनर्विलोकन अर्ज दाखल करून घेत, या प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू केलीआहे तर महसूल मंत्र्यांकडेहीहे प्रकरण सुनावणीसाठी प्रलंबित आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा