शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना जिल्हाप्रमुख  कांदे यांच्याविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 01:17 IST

शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास द्वारकानाथ कांदे (रा़ काळेनगर, पाइपलाइनरोड, आनंदवली) यांनी बंदुकीचा धाक दाखवून गाळा बळकाविल्याची फिर्याद रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)चे शहराध्यक्ष पवन क्षीरसागर यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात शनिवारी (दि़१५) दिली़

नाशिक : शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास द्वारकानाथ कांदे (रा़ काळेनगर, पाइपलाइनरोड, आनंदवली) यांनी बंदुकीचा धाक दाखवून गाळा बळकाविल्याची फिर्याद रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)चे शहराध्यक्ष पवन क्षीरसागर यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात शनिवारी (दि़१५) दिली़  क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २७ नोव्हेंबर २००७ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ते कॅनडा कॉर्नर बीएसएनएल कार्यालया-समोरील सिल्व्हर प्लाझा बिल्डिंग येथील सात नंबरच्या स्वत:च्या गाळ्यात बसलेले होते़ त्यावेळी सुहास कांदे यांनी बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत कोऱ्या कागदावर तसेच काही हिरवे लेझर पेपरवर सह्या घेतल्या़ तसेच गाळ्याबाहेर काढून या गाळ्यास स्वत:चे कुलूप लावल्याचे म्हटले असून, सुमारे अकरा वर्षांनंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़दरम्यान, केवळ बदनामी करण्याच्या उद्देशाने तसेच राजकीय आकसापोटी क्षीरसागर यांनी हा खोटा गुन्हा दाखल केल्याचे सुहास कांदे यांनी म्हटले आहे़ तसेच ज्या गाळ्याबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचे साठेखत मूळ मालक राजू पनीकर याच्यासोबत २५ जानेवारी २००१, तर कब्जापावती ५ फेब्रुवारी २००१ रोजी झाली असून, पैसेही बँकखात्यातून देण्यात आले आहेत़ तांत्रिक कारणाने विश्वासू कामगार म्हणून कामास असलेल्या क्षीरसागर यांच्या नावावर खरेदी खत करण्यात आले होते़ मात्र, त्यानंतर १२ जुलै २००१ साली क्षीरसागर यांनी माझ्या लाभात या गाळ्याचे मुखत्यारपत्र करून दिल्याची कागदपत्रे सादर केली असल्याचे कांदे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliceपोलिस