शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅक्टोबर हीट’चा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:28 IST

सिन्नर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे ‘आॅक्टोबर हीट’चा तडाखा जाणवू लागला आहे. वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत.

ठळक मुद्देशेतातील पिके करपल्याने मजुरांनाही रोजगार मिळत नाही.

सिन्नर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे ‘आॅक्टोबर हीट’चा तडाखा जाणवू लागला आहे. वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत.तालुक्यात सध्या विचित्र वातावरण निर्माण झाले असून, पहाटे हलकासा गारवा, दिवसभर कडक ऊन व रात्रीच्या वेळी उकाडा निर्माण होत आहे. त्यामुळे या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. यावर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता; परंतु पावसाळ्याचे चार महिने संपले तरीही तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. पावसाअभावी संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे.मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांवर अद्यापही वरुणराजाने कृपादृष्टी केली नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून शहरासह तालुक्यात तपमान वाढले आहे. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचा पारा वाढत असून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत कडक ऊन पडत आहे. या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पाऊस गायब होऊन त्याची जागा कडक उन्हाने घेतली आहे.हस्त नक्षत्रात सर्वसाधारणपणे ऊन असतेच; परंतु यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ऊन तापू लागले आहे. त्यामुळे आॅक्टोबर हीटचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. दैनंदिन जनजीवनावर उन्हाचा परिणाम झाला असून, दुपारच्या वेळी ग्रामीण व शहरी भागातील रस्ते सुमसान होत आहेत. शेतकºयांना सध्या परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र पावसाऐवजी उन्हाची तीव्रताच वाढत चालण्याने शेतकºयांच्या चिंता वाढत चालल्या आहेत.पावसाने यावर्षी शेतकºयांची प्रचंड निराशा केली असून, हवामान खात्याचे सर्व अंदाज फोल ठरले आहेत. सुरुवातीपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. एकही मोठा पाऊस झाला नसल्याने नदी, नाले, पाझर तलाव कोरडेठाक आहेत. पाऊस नसल्याने शेतीची कामे ठप्प आहेत. शेतातील पिके करपल्याने मजुरांनाही रोजगार मिळत नाही.