शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मुहर्रमच्या आशुरानिमित्त घरांतच केले नमाजपठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 01:40 IST

मुस्लीम बांधवांचे इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४२ ला शुक्रवारपासून (दि. २१) प्रारंभ झाला असून, या नववर्षाचा पहिला महिना मुहर्रमचा दहावा दिवस रविवारी (दि.३०) हजरत शहीद-ए-आझम इमाम हुसेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यौम-ए-आशुरा म्हणून मुस्लीम बांधवांकडून पाळण्यात आला. बहुतांश समाजबांधवांकडून निर्जली उपवास (रोजा) करण्यात आला. आशुरानिमित्त खास नमाजपठण मशिदींऐवजी घरांतच करण्यात आले.

ठळक मुद्देइमामशाहीत शुकशुकाट : धार्मिक कार्यक्र म

नाशिक : मुस्लीम बांधवांचे इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४२ ला  शुक्रवारपासून (दि. २१) प्रारंभ झाला असून, या नववर्षाचा पहिला महिना मुहर्रमचा दहावा दिवस रविवारी (दि.३०) हजरत शहीद-ए-आझम इमाम हुसेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यौम-ए-आशुरा म्हणून मुस्लीम बांधवांकडून पाळण्यात आला. बहुतांश समाजबांधवांकडून निर्जली उपवास (रोजा) करण्यात आला. आशुरानिमित्त खास नमाजपठण मशिदींऐवजी घरांतच करण्यात आले.यंदा कोरोनाचे सावट असल्याने इस्लामी नववर्षाचा पहिला महिना मुहर्रमच्या पहिल्या दहा दिवसांत शहरात होणाऱ्या जश्न शोहदा-ए-करबलाच्या प्रवचनमाला पार पडल्या नाहीत. काही धार्मिक संस्थांकडून आॅनलाइन पद्धतीने प्रवचनमाला घेतल्या गेल्या. यावर्षी कोरोनामुळे सारडा सर्कलवरील हजरत इमामशहा बाबा दर्गा यांच्या इमामशाहीमध्ये तीनदिवसीय यात्रोत्सवही कोरोनामुळे होऊ शकला नाही. येथील मनाचा ताबूत भाविकांच्या दर्शनासाठी मैदानात आणला गेला नाही. केवळमानकरी हिंदू-मुस्लीम सेवेकरी वर्गाने पारंपरिक प्रथा पाळत अळीवच्या बियांपासून हिरवळीचा मानाचा ताबूत उभारला.इस्लामी कालगणनेचा पहिला महिना म्हणून मुहर्रम ओळखला जातो. धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे प्रिय नातू शहीद-ए-आझम हजरत इमाम हुसेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुहर्रमच्या पहिल्या दहा दिवसांत त्यांचा संदेश, शिकवणीना उजाळा दिला जातो. यंदा समाजबांधवांनी आपापल्या घरांतच राहून मजलिस पठण, करबलाचा संदेश यावर मंथन, विवेचन धार्मिक पुस्तकांद्वारे केले.हिंदू बांधव असतातताबूतचे खांदेकरीसुमारे तीनशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून चालत आलेल्या पारंपरिक प्रथेप्रमाणे सारडा सर्कल येथील इमामशाही दर्ग्यामध्ये सय्यद कुटुंबीयांनी दहा दिवस परिश्रम घेत ताबूत उभारला. या ताबूतचे खांदेकरी म्हणून आशुराच्या दिवशी रविवारी हिंदू कोळी बांधवांनी खांदेकरी होत परंपरा कायमठेवली.

टॅग्स :Nashikनाशिकmuharramमुहर्रम