शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मिसळ पार्टीच्या निमित्ताने शिवसैनिकांची झणझणीत चर्चा अफवांना ऊत : बागुल यांचे संयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:26 IST

शिवसेना सोडून तसे सुनील बागुल यांना अनेक वर्षे झाली, या पक्षातून राष्ट्रवादीत आणि तेथून भाजपात दाखल झाले, परंतु मूळ पक्ष कसा विसरता येणार? बहुधा यातूनच त्यांनी जुन्या शिवसैनिकांना मिसळ पार्टीसाठी आमंत्रित केले

ठळक मुद्देपूर्वीचे दिवस राहिले नाही, हाच सूर जुन्या काळातील मित्रत्व कायम बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा

नाशिक : शिवसेना सोडून तसे सुनील बागुल यांना अनेक वर्षे झाली, या पक्षातून राष्ट्रवादीत आणि तेथून भाजपात दाखल झाले, परंतु मूळ पक्ष कसा विसरता येणार? बहुधा यातूनच त्यांनी जुन्या शिवसैनिकांना मिसळ पार्टीसाठी आमंत्रित केले; परंतु त्यापेक्षा झणझणीत चर्चा झडली ती शिवसेनेवर! पूर्वीच्या शिवसेनेला उजाळा देण्यात आला खरा; परंतु आता पूर्वीचे दिवस राहिले नाही, हाच सूर राहिला.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने शिवसेनेत आलेली फळी अद्याप ना सेनेला विसरली, ना बाळासाहेबांना. त्यामुळे या पार्टीच्या अखेरीस शिवसेनाप्रमुखांचा जयजयकार करण्यात आला. बागुल आता भाजपात असून, प्रदेश उपाध्यक्ष आहेत. तरीही जुन्या काळातील मित्रत्व कायम आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी मखमलाबाद येथील एका हॉटेलमध्ये मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने शिवसेनेतील सुमारे दोनशे ते अडीचशे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, जयंत दिंडे, शोभा मगर, अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांच्यापासून सध्याच्या शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख अ‍ॅड. श्यामला दीक्षित यांच्यापर्यंत अनेक जण यावेळी उपस्थित होते. बाळासाहेबांच्या आठवणींना खुद्द बागुल यांनीच उजाळा दिल्यानंतर साºयांनीच आपल्या आठवणी सांगितल्या. यानिमित्ताने जुन्या काळातील आठवणी सांगताना अनेकांचा ‘आता ते दिवस राहिले नाही’ असाच सूर होता. शिवाजी सहाणे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पूर्वीचे निकष आणि आता उमेदवारीबाबत करण्यात आलेल्या चर्चा सांगितल्याचे समजते. बैठकीच्या निमित्ताने अनेकांनी अशाच प्रकारे वेळोवेळी भेटले पाहिजे, असे मत व्यक्त करतानाच दत्ता गायकवाड यांनी पुढील स्नेहमेळावा नाशिकरोड येथे आयोजित करण्याची तयारी दर्शविली.चर्चा मात्र वेगळी सुनील बागुल सध्या भाजपात प्रदेश कार्यकारिणीवर असताना त्यांना जुन्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची आठवण येणे काय दर्शविते? महापालिका निवडणुकीत त्यांचे शहर नेतृत्वाशी उडालेले खटके हे चर्चेत आहेत. त्यामुळे या मिसळ पार्टीमागील चर्चा मात्र वेगळीचहोत राहिली.