लोकमत न्यूज नेटवर्कवाडीवºहे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या येथील राम मंदिर पायाभरणी कार्यक्र म बुधवारी (दि.५) झाल्याच्या निमित्ताने कार्यक्र मानिमित भाजप युवा मोर्चाच्या वतीने घोटी शहरात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश परदेशी व बाळासाहेब सुराणा यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाचे सरचिटणीस मयूर परदेशी यांच्यासह गणेश शिंदे, निखिल हंडोरे, मयूर कडवे, मनीष मुनोत, विक्र म मुनोत, योगेश कडवे, ज्ञानेश्वर भोर, दीपक भोर, निलेश जोशी यांनी २१०० पणत्या व मिठाईचे वाटप केले.दरम्यान तालुक्यात हिंदू बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या कार्यक्र माच्या पार्श्वभूमीवर घोटी शहरात पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
राम मंदिर उभारणी निमित्ताने घोटीत पणत्या,मिठाई वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 16:47 IST
वाडीवºहे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या येथील राम मंदिर पायाभरणी कार्यक्र म बुधवारी (दि.५) झाल्याच्या निमित्ताने भाजप युवा मोर्चाच्या वतीने घोटी शहरात २१०० पणत्या व मिठाईचे वाटप केले.
राम मंदिर उभारणी निमित्ताने घोटीत पणत्या,मिठाई वाटप
ठळक मुद्दे२१०० पणत्या व मिठाईचे वाटप