नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. ३) बाधितांची एकूण संख्या ७१ झाली असून, ५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६३९ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात एकूण उपचारार्थी संख्या ९७३ झाली असून, त्यात ६३९ नाशिक ग्रामीण, ३०० नाशिक मनपा, २४ मालेगाव मनपा, तर १० जिल्हा बाह्यरुग्ण आहेत. जिल्ह्यात ८०१ अहवाल प्रलंबित असून, त्यातील ३४८ नाशिक ग्रामीणचे, २६१ नाशिक मनपाचे, तर १९२ मालेगाव मनपाचे आहेत.