शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६.३३ लक्ष हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 23:24 IST

नाशिक : जिल्ह्यात खरिपाचे एकूण ५.७६ लक्ष हेक्टर क्षेत्र असून, यावर्षी जिल्ह्याच्या कृषी विभागाने ६.३३ लक्ष हेक्टरवर (११० टक्के ) खरीप पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्या दृष्टीने विभागाने खरीप हंगामाची तयारी केली असून, उत्पादनवाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

नाशिक : जिल्ह्यात खरिपाचे एकूण ५.७६ लक्ष हेक्टर क्षेत्र असून, यावर्षी जिल्ह्याच्या कृषी विभागाने ६.३३ लक्ष हेक्टरवर (११० टक्के ) खरीप पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्या दृष्टीने विभागाने खरीप हंगामाची तयारी केली असून, उत्पादनवाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.यावर्षी पाऊस समाधानकारक पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लॉकडाउनच्या काळातही खरीप हंगामची जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हा कृषी विभागानेही खरिपाचे नियोजन पूर्ण केले असून, त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे . जिल्ह्यात खरिपाचे एकूण ५.६३ लक्ष हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. गतवर्षी उसाचे क्षेत्र वगळता एकूण ६.३७ लक्ष हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. यावर्षी ६.३३ लक्ष हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यावर्षी तृणधान्यची ४.४७ लक्ष हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. यातून ११४०५.७० लाख मेट्रिक टन उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून कडधान्य पेरणीस पसंती दिल्याने कडधान्याच्या उत्पादनात काहीअंशी वाढ झाली आहे. यावर्षीही ०.३३ लक्ष हेक्टरवर कडधान्य पेरणी प्रस्तावित असून, त्यापासून १.३३ लाख मेट्रिक टन कडधान्य उत्पादनाची अपेक्षा असून, यावर्षी तुरीला प्राधान्य देण्यात येत आहे. गळीत धान्यासाठी १.०९ लक्ष हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, पावसाचा अंदाज आणि सूक्ष्म सिंचन करून सोयाबीनचे हेक्टरी १७४० किलोग्राम उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट आहे. सोयाबीनसाठी ०.७६ लाख हेक्टरचे नियोजन आहे. पूर्व भागात ०.८८ लाख हेक्टरवर भात पेरणीचे कृषी विभागाचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागात कापूस हे मुख्य खरीप पीक असून, या पिकात मूग, उदीड ही कमी कालावधीची आंतरपीक घ्यावीत यासाठी कृषी विभागाकडून शेतकºयांचे प्रबोधन केले जात आहे.------मका पेरणीचे उद्दिष्टकमी पर्जन्यमान असलेल्या परिसरात बाजरी पिकाला प्राधान्य देण्यात आले असून, बाजरीसाठी १.०५ लक्ष हेक्टरचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र वाढले असून, यावर्षी २.२५ लाख हेक्टरवर मका पेरणीचे उद्दिष्ट आहे. लष्करी आळीच्या नियोजनासाठीही प्रयत्न होत आहेत. खरीप हंगामात शेतकºयांना विविध प्रशिक्षण दिले जात असून, महिला शेती शाळा घेण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक