शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

उद्दिष्ट पाचशे कोटींचे, उत्पन्न सात कोटी...

By admin | Updated: September 21, 2015 23:19 IST

नियोजन फसले : ‘एसटी’चे कुंभपर्व तोट्यात

नाशिक : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन नाशिक-त्र्यंबकच्या शाही पर्वण्यांसाठी धावणाऱ्या ‘एस.टी’चा हेतू सफल झाला असला तरी उद्दिष्टपूर्तीच्या बांधापासून महामंडळाला कोसो दूर रहावे लागले. तीनही पर्वण्यांसाठी दाखल झालेल्या भाविकांच्या वाहतुकीद्वारे महामंडळाला सात कोटींचे उत्पन्न प्राप्त होऊ शकल्याने कुंभ पर्व एसटीसाठी तोट्याचे ठरले.महाकुंभमेळ्याच्या शाहीस्नानाच्या पर्वण्या साधण्यासाठी महामंडळाने जय्यत तयारी केली होती; मात्र अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी भाविक दाखल झाल्यामुळे एसटी तोट्यात गेली. पर्वणीकाळात एसटी गतिमान असली तरी त्या तुलनेत ग्राहक उपलब्ध नसल्यामुळे एसटीला उद्दिष्टाच्या जवळपासही पोहचता येणे तर दूरच मात्र दुहेरी आकडादेखील गाठता आला नाही. पहिली पर्वणी तर एसटीसाठी कुठल्याही दृष्टीने फलदायी ठरली नाही. याला भाविकांची अत्यल्प संख्या व पोलीस प्रशासनाने शहराभोवती आवळलेला बंदोबस्ताचा फास कारणीभूत असल्याचे बोलले जात होते. पहिल्या पर्वणीला भाविकांच्या वाहतूक करणाऱ्या बहुसंख्य बसेस या रित्या राहिल्या परिणामी महामंडळाच्या तिजोरीतही फारसा फरक पडला नाही. पहिली पर्वणी महामंडळाला साधता आली नाही; म्हणून महामंडळाच्या पदरी निराशा पडली होती; मात्र तरीही आशावाद कायम ठेवत महामंडळाने दुसऱ्या पर्वणीसाठी विशेष नियोजनाची आखणी केली. एसटीच्या या नियोजनाला साथ लाभली ती पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या फेरनियोजनाची. यामुळे एसटीजवळ भाविक येऊ शकले आणि दुसऱ्या पर्वणीला एसटीच्या पदरात तीन कोटींचे उत्पन्न पडले. तिसऱ्या अन् अखेरच्या पर्वणीला एसटीला फटका बसला तो पावसाचा. यामुळे एसटीला फारसे उत्पन्न मिळू शकले नाही. कारण तिसऱ्या पर्वणीला भाविकांची संख्या कमीच राहिली. राजकीय नेत्यांकडून कितीही मोठ्या आकडेवारीचा दावा के ला गेला असला तरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्या दाव्यानुसार भाविकांची वाहतूक एसटीच्या नशिबी आली नाही. संपूर्ण कुंभपर्व काळामध्ये एसटीला अवघे सात कोटी रुपयांचे उत्पन्न झाल्याची माहिती विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. (प्रतिनिधी)