नाशिक : पालिकेच्या वतीने दैनंदिन कचरा गोळा करताना ओला- सुका कचरा वेगळा करूनच तो खत प्रकल्पावर पाठवावा, असे आदेश आयुक्त सोनाली पोंक्षे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता घंटागाड्यांमध्ये अशा प्रकारचा कचरा वेगळा ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार असून, नागरिकांनी घरातील कचरा देताना ओला व सुका असे वर्गीकरण करूनच तो घंटागाडी कर्मचाऱ्यांना द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ओला- सुका कचरा वेगळा पाठवावा, असे आदेश
By admin | Updated: October 6, 2014 00:12 IST