शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजात अडकून २८ पाखरांचे कापले पंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:59 IST

आठवड्यापूर्वी मकरसंक्रांतीचा सण उत्साहात पार पडला. सर्वत्र तीळगूळ वाटप करून ‘गोड बोला’ असे आवाहन केले गेले; मात्र मकरसंक्रांत पक्ष्यांसाठी ‘गोड’ कधी ठरणार?

नाशिक : आठवड्यापूर्वी मकरसंक्रांतीचा सण उत्साहात पार पडला. सर्वत्र तीळगूळ वाटप करून ‘गोड बोला’ असे आवाहन केले गेले; मात्र मकरसंक्रांत पक्ष्यांसाठी ‘गोड’ कधी ठरणार? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. नायलॉन मांजावर बंदी लादली गेली असली तरी संक्रांतीपासून अद्याप नायलॉन मांजाचा वापर सर्रास होत असून, पाखरांचा जीव टांगणीलाच असल्याचे चित्र दिसते. आतापर्यंत २८ पक्षी नायलॉन मांजात अडकून जायबंदी झाले आहेत.तीळगूळ वाटप करत मकरसंक्रांतीचा गोडवा अधिकाधिक वृद्धिंगत केला जातो. हा सण नव्या इंग्रजी वर्षाच्या पहिल्या महिन्यात येत असल्यामुळे संपूर्ण वर्षभर विविध नातेसंबंधात गोडवा टिकून रहावा, यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या मित्र-परिवाराला तीळगूळ देत गोड बोलण्याची साद घालतो. या सणाच्या औचित्यावर पतंगबाजीचा उत्साह शहरात चांगलाच पहावयास मिळाला. चोरीछुप्या पद्धतीने वापरलेल्या नायलॉन मांजामुळे पक्षी जायबंदी होण्याच्या घटना संक्रांतीच्या पूर्वसंध्येपासूनच वाढल्या आहेत. नायलॉन मांजा तुटून झाडांवर अडकतो आणि एकप्रकारे हा पक्ष्यांसाठी ‘सापळा’ ठरतो. या आठवडाभरात सुमारे २८ पक्षी नायलॉन मांजात अडकून जायबंदी झाले. शहरातील विविध उपनगरांमध्ये कार्यरत असलेल्या पक्षिमित्रांनी नायलॉन मांजात अडकलेल्या पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी आलेल्या ‘कॉल’ला दाद देत धाव घेतली. शहरात तब्बल २८ ते ३० पक्ष्यांचा जीव वाचविण्यात त्यांना यश आले. अशा दुर्घटना घडू नये याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.तेरा कबुतर जखमी; तीन मृत्युमुखीमकरसंक्रांतीपासून नायलॉन मांजाचा वापर अधिकाधिक वाढल्यामुळे १३ कबुतर (पारवा) जायबंदी झाल्याची घटना शहरात घडली. यामध्ये तीन कबुतर जागीच गतप्राण झाले. आठवडाभरात २८ ते ३० पक्षी जखमी झाल्याचे समोर आले आहे. जखमी पक्ष्यांमध्ये कबुतर, गायबगळा, करकोचा, घुबड, कोकीळ, घार आदी पक्ष्यांचा जखमींमध्ये समावेश आहे.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीNashikनाशिक