शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘पोषण’ कुणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:39 IST

एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ... या उक्तीचा वेगळ्या प्रकारे परिचय देण्यात नोकरशाहीचा हात कुणी धरू नये.

ठळक मुद्देनिष्कर्षातील फोलपणा स्पष्ट होणारावैद्यकीय सुविधांबाबतच्या समस्या पुढे मुद्द्याबाबत राज्य सरकारही गंभीर

-साराश-किरण अग्रवालएकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ... या उक्तीचा वेगळ्या प्रकारे परिचय देण्यात नोकरशाहीचा हात कुणी धरू नये. कुणी कितीही चुकला अगर त्यावर ताशेरे ओढले गेले, तरी शक्यतो सहकारीला वाचविण्याचीच मानसिकता या वर्गात आढळते. जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या कामकाजाबाबत समाधान वर्तविणारे जिल्हा परिषदेच्या महिला, बालकल्याण विभागातील अधिकारी-कर्मचारीही यास अपवाद ठरू नयेत.जिल्हा परिषदेच्या शाळांची जिल्ह्यातील अवस्था हा जसा कायम टीकेचा विषय ठरत आला आहे, तसाच अंगणवाड्यांची समस्याही नेहमी चर्चित ठरली आहे. या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांची स्थिती, त्यांचा दर्जा व तेथील कामकाज आदी बाबी समजून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने एक हजार अंगणवाड्यांना भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला होता. यातील सुमारे ७५० अंगणवाड्यांना या खात्याच्याच अधिकाºयांनी भेटी देऊन व पाहणी करून जो निष्कर्ष काढला तो थक्क करणारा आहे, कारण ८० टक्के अंगणवाड्यांचे कामकाज समाधानकारक असल्याचे हा निष्कर्ष आहे. विशेषत: अंगणवाड्यांतील व त्यातही आदिवासी दुर्गम भागातील लहान मुलांच्या कुपोषणाची स्थिती पाहता या निष्कर्षातील फोलपणा स्पष्ट होणारा आहे. गेल्या वर्षीच्या आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील तीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण २४१ होते, जे पुढच्याच नोव्हेंबरमध्ये दुपटीने वाढून ५४० इतके झाल्याची आकडेवारी याच यंत्रणेने दिली आहे. तेव्हा अशी स्थिती असताना डिसेंबरमध्ये केल्या गेलेल्या तपासणीत एकदम ८० टक्के अंगणवाड्यांचे कामकाज समाधानकारक आढळावे व कुपोषणासारख्या चिंताजनक समस्येवर मात करण्यात मोठे यश लाभलेले दिसून यावे, हे खरेच शंकास्पदच आहे. निधीच्या अडचणीमुळे पोषण आहारासारख्या व वैद्यकीय सुविधांबाबतच्या समस्या पुढे आलेल्या दिसत असताना समाधानाचा सुस्कारा सोडला गेल्याने या पाहणी प्रकल्पाच्या खरे-खोटेपणाचा संशय बळावून गेला आहे. संबंधितांनी प्रत्यक्ष ग्रामीण, दुर्गम भागात जाऊन अंगणवाड्यांना भेटी दिल्या व तेथील बालकांच्या वजनाची तपासणी आपल्या डोळ्यादेखत केली, की कार्यालयात वा घरी बसल्या बसल्याच निष्कर्षाची कागदपत्रे रंगविलीत, असा प्रश्न यातून उपस्थित होेणारा आहे. कुपोषणाच्या प्रश्नावरून मध्यंतरी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बरीच गाजली होती. या मुद्द्याबाबत राज्य सरकारही गंभीर आहे. परंतु जिल्हा परिषदेतील नोकरशाही त्याकडे गांभीर्याने बघणार नसेल तर, या दौºयावर गेलेल्यांची व त्यांनी सादर केलेल्या अहवालाची वेगळ्या यंत्रणेमार्फत चौकशी करून यातील बोगसगिरी उघडी पाडली जाणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेतील अधिकारी राजकारण करतात, असे मत मुख्य कार्यकारी अधिकाºयांनीच नोंदवत एकप्रकारे हतबलता प्रदर्शित केल्याच्या पार्श्वभूमीवर तर या अंगणवाडी भेटी प्रकल्पाची चौकशी होणे अधिक महत्त्वाचे ठरावे. या संदर्भात आदिवासी भागातील लोकप्रतिनिधींच्या तक्रारी कायम आहेत. परंतु अधिकाºयांनी अंगणवाड्यांतील कामकाजाला समाधानाचे प्रमाणपत्र बहाल केल्याने हे तक्रार करणारे लोकप्रतिनिधीच तोंडघशी पडल्यासारखे झाले आहे. तेव्हा, आता जिल्हा परिषद सदस्यांनी या पाहणी दौºयानिमित्त कुणाचे ‘पोषण’ झाले याचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा.