शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘पोषण आहार’ सप्ताहाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 00:45 IST

नाशिक : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात ८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान राबविण्यात येत असून, ग्रामस्तरावर गुरुवारपासून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स ठेवून व नियमांचे पालन करून छोट्या गटांमध्ये उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देगरोदर माता, बालकांचे सशक्तीकरण करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात ८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान राबविण्यात येत असून, ग्रामस्तरावर गुरुवारपासून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स ठेवून व नियमांचे पालन करून छोट्या गटांमध्ये उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी हे अभियान राबविण्यात येते. ३० सप्टेंबरपर्यंत चालणारे हे अभियान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार असून, मातेला पोषक आहार व चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी व माता व बालकाचे पोषण योग्यरीत्या होण्याबरोबरच कुपोषण दूर होण्यास हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य जीवनन्नोती अभियांनातर्गत कार्यरत ग्रामसंघानाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश तालुका व ग्रामस्तरीय यंत्रणेला देण्यात आले असून, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आणि आरोग्य सेविका यांच्या समन्वयातून ग्रामस्तरावर अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली.पोषण अभियानात पोषण आहार व त्याचे महत्त्व, अनेमिया आजार, गरोदर व स्तनदा माता यांच्याकडे गृहभेटी करणे, ० ते ६ वर्ष वयोगटांतील बालकांचे वजन व उंचीचे मापन करणे, अंगणवाडी केंद्रांच्या आवारात परसबागांची निर्मिती करणे, छोट्या गटांमध्ये अल्प व मध्यम कुपोषित बालकांच्या पालकांची बैठक घेणे, लसीकरण करणे आदी विषयांवर अधिक लक्ष देण्यात येणार असून, गृहभेटीद्वारे पोषण आहार, चांगल्या आरोग्याच्या सवयी याचे महत्त्व पटवून देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अश्विनी आहेर यांनी दिली.एक मूठ पोषण उपक्रमएक मूठ पोषण उपक्रमांतर्गत मध्यम व तीव्र वजगटातील बालक, मध्यम व तीव्र कुपोषित श्रेणीतील बालक, गरोदर माता यांच्यासाठी दररोज ५ मि.ली. खोबरेल तेल, १ उकडलेला बटाटा, १ अंडी, २० ते ४० ग्रॅम मोड आलेले कडधान्य, मुठभर चणे, फुटाणे, गूळ देण्यात येणार आहे. यामुळे बालक तसेच मातांचे पोषण होण्यास मदत होणार असून, यामध्ये ग्रामपंचायतीही सहभागी आहेत.

टॅग्स :Governmentसरकारzpजिल्हा परिषद