शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांना सप्टेंबरअखेरपर्यंत पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 19:48 IST

बालके, गरोदर महिला, स्तनदा माता यांच्याबाबत कोरोना काळात कशाप्रकारे काळजी घेतली जाते याबाबत जाणून घेण्यात आले.

ठळक मुद्देअश्विनी आहेर यांची इगतपुरीला भेट : वाटपाचा आढावाबालकांचे वजन घेऊन लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाच्या संक्रमण काळात जिल्ह्यातील अंगणवाड्या अद्यापही बंदच असल्याने अंगणवाडीतील बालके, स्तनदा व गरोदरमातांसाठी घरपोच पोषण आहार देण्यात येत असून, पावसाळा व कोरोनाचा विचार करता सर्व अंगणवाड्यांना सप्टेंबरअखेरपर्यंत पोषण आहार पुरविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांनी इगतपुरी तालुक्याला भेट देऊन पोषण आहाराचा आढावा घेतला.

सभापती अश्विनी आहेर यांनी इगतपुरी तालुक्यातील घोटी (संभाजीनगर), बोरटेंभे, पिंप्रीसदो, भावली येथील अंगणवाडी केंद्र तसेच पंचायत समिती इगतपुरी, एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्प (आयसीडीएस) कार्यालयास भेट देऊन घोटी येथील अंगणवाडीसेविकांची बैठक घेण्यात येऊन त्यात बालके, गरोदर महिला, स्तनदा माता यांच्याबाबत कोरोना काळात कशाप्रकारे काळजी घेतली जाते याबाबत जाणून घेण्यात आले. सर्व बालकांना अंगणवाडीसेविकामार्फत घरपोच गरम ताजा आहार, अमृत आहार दिला असून, सर्व बालकांचे वजन घेऊन लसीकरण करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी बालकांचे कुपोषण कमी होऊन बालमृत्यू होऊ नये, बाळाची काळजी योग्यप्रकारे घेतला जावी यासाठी स्तनदा मातांना बेबी केअर किटचे वाटप सभापतींच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी भागातील मुलांना राष्ट्रपती अब्दुल कलाम अमृतआहार योजनेंतर्गत पिंपी सदो येथील लाभार्थ्यांना अंडी वाटप करण्यात आले.इगतपुरी पंचायत समिती एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात इगतपुरी तालुक्यातील सर्व पर्यवेक्षिकांची बैठक घेऊन कामकाज आढावा घेण्यात आला. बैठकीत अमृत आहार, गरम ताजा आहार, टी.एच.आर, गृहभेटी, ग्राम बाल विकास केंद्राचा आढावा घेण्यात आला. कोरोना पार्श्वभूमीवर गृह व्ही.सी.डी.सी चालू आहेत. त्यामुळे प्रत्येक कुपोषित बालकांना अंगणवाडीसेविकामार्फत बालकांना आहार देण्याच्या तसेच पोषण आहारबाबत कोणतीही तक्रार आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा सभापती आहेर यांनी दिला. याबैठकीस इगतपुरीचे बालविकास प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे, सहायक बाल विकास प्रकल्प अधिकारी वंदना सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद