शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नर्सिंगच्या विद्यार्थिनींचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:16 IST

दिंडोरी रोडवरील चिंचबारी येथील ग्लोबल नर्सिंग महाविद्यालयाने शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक शुल्कामध्ये फसवणूक केल्याचा आरोप करून विद्यार्थ्यांनी आदिवासी आयुक्तालयासमोर सोमवारी (दि़२) ठिय्या आंदोलन केले़

नाशिक : दिंडोरी रोडवरील चिंचबारी येथील ग्लोबल नर्सिंग महाविद्यालयाने शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक शुल्कामध्ये फसवणूक केल्याचा आरोप करून विद्यार्थ्यांनी आदिवासी आयुक्तालयासमोर सोमवारी (दि़२) ठिय्या आंदोलन केले़ महाविद्यालयातील शिक्षक व प्रशासनाकडून दिला जाणारा हेतुपुरस्सर मानसिक त्रास देत, अभ्यास सोडून इतर कामे तसेच आदिवासी असल्याने जातिवाचक शिवीगाळ केली जात असल्याचा आरोपही या विद्यार्थ्यांनी केला असून,  या प्रकरणाची समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली़  दिंडोरी रोडवरील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान  विद्यापीठाजवळील चिंचबारी शिवारात ग्लोबल कॉलेज आॅफ नर्सिंग आहे़ या महाविद्यालयात नंदुरबार, पालघर तसेच नाशिक जिल्ह्यातील अनुसूचित जमातीमधील सुमारे शंभराहून अधिक मुले आणि मुली नर्सिंग अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. मात्र विद्यालयाने या विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळी ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत देणगी घेतली तसेच शैक्षणिक फी भरूनही कुठल्याही प्रकारच्या पावत्या दिलेल्या नाहीत.  यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी इतर संस्थेत प्रवेश करून न्याय मिळवून द्यावा म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लकी जाधव नेतृत्वाखाली आदिवासी आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या शिष्यवृत्तीच्या तक्रारीची दखल आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे़ यासाठी एक समिती गठित करून सखोल चौकशी केल्यानंतर शैक्षणिक फी व शिष्यवृत्तीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे़ याबरोबरच याबाबत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे तक्रार करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले़जातिवाचक शिवीगाळया महाविद्यालयात शिकविण्यासाठी तज्ज्ञ शिक्षक नाहीत, शिवाय आदिवासी असल्यामुळे विद्यार्थिनींना जातिवाचक शिवीगाळ केली जाते़ या ठिकाणी प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली असून, गैरहजेरीसाठी सक्तीने दंडवसुली केली जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे़

 

टॅग्स :Nashikनाशिक