नर्सेस संघटना करणार मंगळवारपासून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:06 PM2020-08-29T23:06:45+5:302020-08-30T01:10:02+5:30

नाशिक : नर्सेसच्या प्रलंबित मागण्यांसाठी १ सप्टेंबरपासून संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला असून, ८ सप्टेंबरपर्यंत सरकारने मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या राज्य अध्यक्ष शोभा खैरनार यांनी दिली.

The nurses' union will hold agitation from Tuesday | नर्सेस संघटना करणार मंगळवारपासून आंदोलन

नर्सेस संघटना करणार मंगळवारपासून आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्दे आठ दिवसांची मुदत । अन्यथा कामबंद आंदोलन

नाशिक : नर्सेसच्या प्रलंबित मागण्यांसाठी १ सप्टेंबरपासून संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला असून, ८ सप्टेंबरपर्यंत सरकारने मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या राज्य अध्यक्ष शोभा खैरनार यांनी दिली.
या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना फक्त शाब्दिक दिलासा देण्यात आला, मात्र त्यांच्या प्रलंबित मागण्याचा विचार करण्यात आला नाही. आरोग्य खात्यातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, रिक्त पदे भरताना कंत्राटी आरोग्य सेवक महिलांचा प्राधान्याने विचार केला जावा, जीवचार्ट ठरवून द्यावा, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर शिफ्ट नुसार कामाचे तास ठरवून द्यावे, अतिरिक्त पदे भरावीत, बंधपत्रित आरोग्य सेवकांची सेवा रुजू दिनांकापासून धरण्यात यावी, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर नियमित करावयाच्या एकूण कामांपैकी ९० टक्के कामे उपकेंद्रांची आर्थिक व भौतिक व्यवस्थापन कुटुंब कल्याण, माता बालसंगोपन यांच्याशी निगडित योजनेची आहे.

Web Title: The nurses' union will hold agitation from Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.