शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिका या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत : माधुरी कांगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:22 IST

दिवसरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या, त्यांच्या नातेवाइकांना दिलासा देणाºया, प्रसंगी खंबीर भूमिका घेत रुग्णहिताच्या गोष्टी आग्रहाने करून घेणाºया परिचारिका या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहेत, वैद्यकीय क्षेत्राचे ते मोठे बलस्थान आहे, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त डॉ. माधुरी कांगणे यांनी केले.

नाशिक : दिवसरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या, त्यांच्या नातेवाइकांना दिलासा देणाºया, प्रसंगी खंबीर भूमिका घेत रुग्णहिताच्या गोष्टी आग्रहाने करून घेणाºया परिचारिका या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहेत, वैद्यकीय क्षेत्राचे ते मोठे बलस्थान आहे, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त डॉ. माधुरी कांगणे यांनी केले. इंडियन मेडिकल असोसिएशन, महिला विभाग, भूलतज्ज्ञ विभाग यांच्या वतीने आयोजित परिचारिका दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शनिवारी (दि.१२) दुपारी शालिमारजवळील आयएमए हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. त्या पुढे म्हणाल्या की, परिचारिकांशिवाय वैद्यकीय क्षेत्र पुढे जाऊच शकत नाही. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राचे आशास्थान असणाया परिचारिकांनी आपले ज्ञान वाढवत न्यावे. सर्वोच्च स्थान प्राप्त करू इच्छिणाºयाला कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसतो हे लक्षात ठेवावे. आजच्या पिढीने सोशल मीडिया, मित्रमैत्रिणींमध्ये निरर्थक वेळ घालवणे, अति टीव्ही पाहणे या गोष्टींचा मोह टाळला पाहिजे. समाजात होत असलेल्या चुकीच्या गोष्टींबाबत जागृत राहावे, पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  हेल्मेटचा वापर आणि सायबर क्राइम या विषयावरही त्यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर डॉ. नितीन वाघचौरे यांनी ‘बेसिक कार्डियाक अ‍ॅण्ड लाइफ सपोर्ट’ याविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. रुग्णाला अचानक कार्डियाक अरेस्ट झाले तर काय करावे यासाठी हे प्रशिक्षण दिले जाते. त्याचे सर्वसामान्य लोक, पॅरामेडिकल स्टाफ व डॉक्टर अशा तीन गटात वर्गीकरण करून प्रशिक्षण देण्याची पद्धत असून, त्या अंतर्गत परिचारिका दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरातून उपस्थित परिचारिकांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.  पाणी शिंपडणे, कांदा हुंगवणे आदी गोष्टींमध्ये वेळ न घालवता त्याचे हृदय चालू आहे का? ते पाहून त्याला बेसिक लाइफ सपोर्ट देत लवकरात लवकर वैद्यकीय उपचार द्यावेत, दवाखान्यात दाखल करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा रुग्णालय, महापालिका रुग्णालय, कामगार रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आदी ठिकाणच्या चांगली कामगिरी करणाºया परिचारिकांचा सत्कार करण्यात आला.  दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी आयएमएचे डॉ.आवेश पलोड, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. नितीन चिताळकर, डॉ. सरला सोहंदानी, डॉ. प्रीती बजाज, डॉ.ज्योत्स्ना पवार, डॉ. दिनेश पाटील, डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. अर्चना बोधले, डॉ. राहुल भामरे, डॉ. वैशाली काळे आदी उपस्थित होते. डॉ. माधवी मुठाळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉक्टर्स, शहरातील विविध रुग्णालयांमधील परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी व नागरिक उपस्थित होते.यांचा झाला सत्कारपरिचारिका दिनाचे औचित्य साधून यावेळी उत्कृष्ट सेवा बजावणाºया परिचारिका व वैद्यकीय कर्मचाºयांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यात दिनेश खैरनार, भाग्यश्री दिवाण, दीपक जाधव, कुमुदिनी अहिरे, रंजना कापडणीस, दीपाली बढे, छाया जामखिंडीकर, योगिता मोगरे, इरा लोखंडे, निशा चव्हाण, मनीषा करवंदे, विमल भालेराव, गीता बाणे, मीनाक्षी केतकर, संगीता बाविस्कर आदींचा समावेश होता.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल