नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विविध कार्यकारी संस्था व इतरत्र संस्थांनी ठराव करून पाठविलेल्या मतदार प्रतिनिधींची संख्या आठ-नऊ हजारांवरून तब्बल साडेतीन हजारांच्या आसपास मर्यादित राहिली आहे. त्यामुळे मागील पंचवार्षिकपेक्षा यंदाच्या निवडणुकीत ही संख्या निम्म्यावर आली आहे. २० फेब्रुवारीपर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे संबंधित विविध सहकारी कार्यकारी संस्थांनी व अन्य सहकारी संस्थांनी ठराव करून मतदार प्रतिनिधींची नावे कळवायची होती. त्यानुसार २० फेब्रुवारीपर्यंत ही नावे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे कळविण्यात आली होती. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला, तर जिल्हा बॅँकेकडून ही नावे २१ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक कार्यालयाला कळविणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पेठ तालुक्याचा अपवाद वगळता सर्व १४ तालुक्यांची माहिती जिल्हा बॅँकेकडे प्राप्त झाली आहे. सहकार प्राधिकरणाने जिल्हा बॅँकेला ठराव पाठविण्याची मुदत २७ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार जिल्हा बॅँकेने मतदार प्रतिनिधींच्या नावे ठराव करण्यात आलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था व अन्य सहकारी संस्थांची माहिती तयार केली आहे. विशेष म्हणजे मागील पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत ठराव करून पाठविलेल्या मतदार प्रतिनिधींची संख्या चक्क ५० टक्क्यापेक्षा जास्त घटल्याचे चित्र आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत मतदार प्रतिनिधींची संख्या निम्म्यावर
By admin | Updated: February 25, 2015 00:42 IST