शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बळींची संख्या १९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 23:47 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी (दि. ७) आलेल्या पॉझिटिव्ह अहवालातील मालेगावचे चार रुग्ण हे यापूर्वीच मृत झालेले असल्याने जिल्ह्यातील बळींची संख्या तब्बल १९वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात १५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यात बाधितांची संख्या ५२१वर पोहोचली आहे.

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी (दि. ७) आलेल्या पॉझिटिव्ह अहवालातील मालेगावचे चार रुग्ण हे यापूर्वीच मृत झालेले असल्याने जिल्ह्यातील बळींची संख्या तब्बल १९वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात १५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यात बाधितांची संख्या ५२१वर पोहोचली आहे.नाशकात आणि विशेषत: जिल्ह्यातील मालेगाव येथे कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू आहे. मालेगाव महापालिका क्षेत्रातील आणखी चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे गुरुवारी (दि. ७) स्पष्ट झाले. मालेगाव येथील हे बाधित गेल्या आठवड्यात दगावले असले तरी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल यंत्रणेला गुरुवारी प्राप्त झाला. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकट्या मालेगावच्या कोरोना बळींची संख्या १५ इतकी झाली आहे. मालेगाव येथे गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनाला अटकाव घालण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना मालेगाव येथील वाढत्या बळींच्या संख्येमुळे धक्का बसला आहे.केवळ मालेगावच नव्हे तर जिल्ह्याच्या अन्य ग्रामीण भागाप्रमाणेच शहरातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ७) १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यापैकी तिघांचे अहवाल हे दुसरे होते. यात मालेगाव येथे चार, येवल्यात दोन, सिन्नर १,  नाशिक शहरातील ४ आणि अन्य क्षेत्रातील चौघांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १३ रुग्ण आज कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. गुरुवारी दिवसभरात १४९ अहवाल प्राप्त झाले.  दरम्यान, जिल्ह्यातील येवला येथे देखील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी येवला येथीलविलगीकरण कक्षाची पाहणी केली. येथील सुविधांचा आढावा घेत त्यांनी उणिवा दूर करत अधिकाऱ्यांनी समन्वयानेआपली जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना दिल्या.

टॅग्स :Nashikनाशिक