नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसात दोन शेतकऱ्यानी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची संख्या ९६ झाली असून, शेतकऱ्याच्या लागोपाठच्या आत्महत्येने प्रशासन हवालदिल झाले आहे.कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण यंदा जानेवारी महिन्यापासून कायम असून, त्यात एक महिनाही खंड पडलेला नाही. विशेष म्हणजे यंदा राज्य सरकारने शेतकऱ्या दिड लाखापर्यंतचे कर्जमाफ करण्याबरोबरच केंद्र सरकारनेही शेतकऱ्यासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. शिवाय चालू वर्षी मान्सूननेही चांगला हात दिल्याने खरीपाची पीक चांगलेच बहरले आहे. अशा परिस्थितीतही जिल्ह्यातील सधन तालुक्यातील शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे विदारक चित्र आहे. मंगळवारी दिंडोरी तालुक्यातील चौसाळे येथील आनंदा नारायण केदारे (७०) या वृद्ध शेतकºयाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापाठोपाठ बुधवारी बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे राहणारे मधुकर पुंडलिक पवार (५४) या शेतकऱ्याने निताने शिावारात विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पवार यांची लाडूत शिवारात शेती असून, त्यांच्या नावे सोसायटीचे कर्ज आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. या घटनेची खबर तहसिल कार्यालयात तसेच नामपुर पोलिसांना देण्यात आली आहे. लागोपाठ दोन दिवसाच्या शेतकरी आत्महत्येने जिल्ह्यातील संख्या ९६ च्या घरात पोहोचली असून, गेल्या वर्षी हेच प्रमाण ८६ इतके होते. शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्याकामी शासनाची कोणतीही मात्रा लागू पडत नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात आणखी दोन शेतकऱ्याची आत्महत्या; संख्या ९६ च्या घरात पोहोचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 20:16 IST
नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसात दोन शेतकऱ्यानी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची संख्या ९६ झाली असून, शेतकऱ्याच्या लागोपाठच्या आत्महत्येने प्रशासन हवालदिल झाले आहे.कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण यंदा जानेवारी महिन्यापासून कायम असून, त्यात एक महिनाही खंड पडलेला नाही. विशेष म्हणजे यंदा राज्य सरकारने शेतकऱ्या दिड लाखापर्यंतचे ...
जिल्ह्यात आणखी दोन शेतकऱ्याची आत्महत्या; संख्या ९६ च्या घरात पोहोचली
ठळक मुद्देकर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण यंदा जानेवारी महिन्यापासून कायम दोन दिवसाच्या शेतकरी आत्महत्येने जिल्ह्यातील संख्या ९६ च्या घरात पोहोचली