शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी कोरोनाबाधितांची संख्या २५३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 18:36 IST

मालेगाव : शहरात कोरोना-बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, एकाच दिवसात ८२ रुग्ण वाढल्याने बाधितांची संख्या २५३वर पोहोचली आहे.

मालेगाव : शहरात कोरोना-बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, एकाच दिवसात ८२ रुग्ण वाढल्याने बाधितांची संख्या २५३वर पोहोचली आहे. बुधवारी शहरात आरोग्यमंत्री राजेश टोपे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनीयेऊन रुग्ण आणि व्यवस्थेची पाहणी करून परतताच तब्बल ८२ रुग्ण वाढल्याने शहरवासीयांना धक्का दिला. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे.  बुधवारी रात्री उशिरापर्यंत थांबून आरोग्यमंत्री टोपे, गृहमंत्री देशमुख, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. त्यांनी बाधित रुग्णांवर उपचार सुरू असणाºया जीवन हॉस्पिटल, मन्सुरा आणि नवीन फरानी हॉस्पिटल येथे भेट देऊन पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि परिचारिका यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करीत त्यांचा आत्मविश्वास वाढविला. मिळणाºया सोई सुविधांविषयी विचारणा करून मालेगावात सर्व सोयी आणि साधने आरोग्य कर्मचारी वाढवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र मंत्रिमहोदय मालेगावातून जाताच पुन्हा झपाट्याने रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य विभाग परत एकदा हादरला असून, शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.शहरातील बकाल वस्ती, झोपडपट्टीचा भाग आणि साक्षरतेचा अभाव आणि कट्टर धार्मिक पगडा यामुळे प्रशासनाला रुग्ण शोधण्यात अडचण येत असून, केवळ अधिकारी बदलून नव्हे तर जे इथे अनेक वर्षे होते ज्यांना शहराची नस समजली आहे असे तत्कालीन प्रांत अजय मोरे आणि अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची मदत घेण्याची गरज आहे. कालपरवापर्यंत सात रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने नागरिकांत आशेचे वातावरण निर्माण झाले असतानाच रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. आता रुग्णसंख्या नियंत्रणात राखण्यासाठी सर्व यंत्रणांना लक्ष ठेवण्याची गरज आहे.

टॅग्स :Nashikनाशिक