शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खटल्यांच्या तुलनेत न्यायधीशांची संख्या कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:48 IST

नाशिक : देशभरात वाढत्या लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीही वाढत चालली असून, दिवसेंदिवस न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्याही वाढते आहे़ मात्र, या प्रलंबित खटल्यांच्या संख्येच्या तुलनेत सद्यस्थितीत काम करणाºया न्यायाधीशांची संख्या अत्यंत तोकडी आहे़ त्यामुळे उभय पक्षांमधील वाद समुपदेशनाने आणि सामंजस्याने सोडविण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी ...

नाशिक : देशभरात वाढत्या लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीही वाढत चालली असून, दिवसेंदिवस न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्याही वाढते आहे़ मात्र, या प्रलंबित खटल्यांच्या संख्येच्या तुलनेत सद्यस्थितीत काम करणाºया न्यायाधीशांची संख्या अत्यंत तोकडी आहे़ त्यामुळे उभय पक्षांमधील वाद समुपदेशनाने आणि सामंजस्याने सोडविण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे यांनी ‘कोर्टाची पायरी चढण्याआधी’ या कार्यक्रमात केले़  रोटरी क्लब आॅफ नाशिक आणि रोटरी क्लब नाशिक (पश्चिम) यांच्या संयुक्तविद्यमाने गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये ‘कोर्टाची पायरी चढण्याआधी’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. जायभावे पुढे बोलताना म्हणाले की, भारतीय दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये सन २००२ च्या दुरुस्त्यांचा गाभा हा कोर्टात प्रकरण दाखल करण्याच्या आधीपासून, प्रकरणाचे काम कोर्टात चालू असताना पक्षकारांमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणे हा महत्त्वाचा भाग आहे. उभय पक्षाचे वकील आणि न्यायालय यांच्यावरील जबाबदारी जायभावे यांनी सांगितली़  राजेश्वरी बालाजीवाले आणि मनीष चिंधडे यांनी मान्यवरांची मुलाखत घेतली.  या कार्यक्रमास रोटरी क्लब आॅफ नाशिकचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल आणि रोटरी क्लब आॅफ वेस्टच्या अध्यक्ष सीमा पछाडे यांच्यासह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेखर ब्राह्मणकर आणि उपासना टिबरेवाल यांनी परिश्रम घेतले.लोकन्यायालयाचे महत्त्वन्या. सुधीरकुमार बुके यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व विशद करून त्यातील तरतुदींची माहिती दिली. न्याय मिळणे खर्चिक होत असताना, लोकन्यायालयाच्या माध्यमातून खटले सामोपचाराने सोडवण्यावर समाजाने भर देणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले़ अ‍ॅड़ इंद्रायणी पटणी यांनी कौटुंबिक वादाच्या वाढत्या तक्रारींबाबत चिंता व्यक्तकरून या न्यायालयातील वादाच्या निराकरणासाठी समुपदेशनाची गरज असल्याचे सांगितले़

टॅग्स :advocateवकिल