शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कोरोना बळींची संख्या ३०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:32 IST

नाशिक : शहरात कोरोनामुळे बळींची संख्या वाढत असून, शनिवारी (दि.१३) एका बाधिताचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३० झाली आहे, तर दिवसभरात तब्बल ३७ रुग्ण आढळले असून, त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या सहाशे पार गेली आहे. शहरात पंचवटी आणि नाशिक मध्य हा परिसर कोरोनाच्या बाबतीत डेंझर झोनमध्ये आहे.

नाशिक : शहरात कोरोनामुळे बळींची संख्या वाढत असून, शनिवारी (दि.१३) एका बाधिताचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३० झाली आहे, तर दिवसभरात तब्बल ३७ रुग्ण आढळले असून, त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या सहाशे पार गेली आहे. शहरात पंचवटी आणि नाशिक मध्य हा परिसर कोरोनाच्या बाबतीत डेंझर झोनमध्ये आहे. शहरात आत्तापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येचा विचार केला, तर सहाशेपैकी दोनशे रुग्ण एकट्या पंचवटी भागात आहे, तर सर्वाधिक १७ बाधितांचे मृत्यू जुने नाशिक आणि वडाळागावात झाले आहेत.शहरात नियंत्रित असलेली कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एप्रिल महिन्यात शहरात केवळ १८ कोरोनाबाधित सापडले होते. मात्र, नंतर शहरातील विविध प्रकारचे निर्बंध शिथिल होताच कोरोनाचा संसर्गदेखील वाढू लागला आहे. विशेषत: दाट वस्तीच्या भागात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर तो नियंत्रणात आणणे महापालिकेला कठीण झाले आहे. दररोज ३० ते ५० रुग्ण आढळत असून, सध्या तर दररोज एका बळीची भर पडत आहे. शनिवारी (दि.१३) दुपारी जुन्या नाशकात एका बाधिताचा मृत्यू झाला. सदरचा रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्यामुळे मृतांची संख्या ३० झाली आहे. तर रात्री आठ वाजेपर्यंत ३७ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या सहाशे पार गेली आहे. शहरात सर्वाधिक बळी जुने नाशिक आणि वडाळा भागात झाले आहेत. वडाळागावात पाच, नाईकवाडी पुरा भागात चार, जुन्या नाशिकमध्ये विविध भागांत तीन, तर पखालरोडवर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दाट वस्तीत मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असल्याने नागरिक धास्तावले आहेत. शनिवारी (दि.१३) बिडी कामगारनगर येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदरची महिला ही जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहे, तर जुन्या गंगापूर नाक्याजवळील एका ५५ वर्षीय संशयित रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला अहे. आरटीओ आॅफिसजवळील ४७ वर्षीय इसमाचा आणि कालिका पेट्रोलपंप या भागातील एका ४५ वर्षीय इसमाचादेखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जुन्या नाशकात कोकणीपुरा येथील ६० वर्षीय वृद्धाचा आणि त्र्यंबक गेट येथील ७१ वर्षीय वृध्दाचा आणि चौक मंडईतील मदिना ज्वेलर्स परीसरातील ७१ वर्षीय वृध्दाला कोरोना संसर्ग झाला आहे. या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सारडा सर्कल परिसरात ६३ वर्षीय वृध्दाचा अहवाल पॉझिटिव्ह असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पखाल रोड, मुंबई नाका येथील दोन बाधित आढळले आहेत. तर पंचवटीत रोहिणीनगर भागात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर रात्री आणखी २३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.--------------------शहरात या भागांत आढळले सर्वाधिक रुग्णशहरातील काही भागांतच कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली असून एकाच भागात अनेक रुग्ण आढळले आहेत. यात सातपूर- अंबड लिंकरोड, पंचवटी विभागात क्रांतिनगर, फुलेनगर, कोणार्कनगर, रामनगर, दिंडोरीनगर, स्नेहनगर, म्हसरूळ शिवार या भागात, सिडकोत लेखानगर, पाटीलनगर, लेखानगर, राणा प्रताप चौक, खोडे मळा, पाथर्डी फाटा, तसेच नाशिकरोड येथील धोंडगे मळा, गोसावी वाडी, कॅनॉल रोड, सिन्नर फाटा, गोसावी वाडी, पंचशीलनगर या भागांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक