नाशिक : शुक्रवारपासून प्रारंभ करण्यात आलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशीदेखील शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शनिवारीदेखील (दि. ०३) रक्तदात्यांच्या संख्येने शतकाचा आकडा ओलांडला असून एकूण १३१ पिशव्या रक्तसंकलन झाले.
कोरोनाचे संकट कमी होत असताना रक्तसाठ्याच्या तुटवड्याची समस्या राज्यात जाणवू लागल्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभिनव उपक्रमाला सलग दुसऱ्या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी दिव्य फाउंडेशनच्या वतीने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये रक्तदानाला प्रारंभ करण्यात आला. दिवसभरात एकूण ६५ पिशव्या रक्तसंकलन झाले. या रक्तदान शिबिरासाठी संस्थेचे शाम मानकर, जगदीश साळवे, विनय निमकर, चंद्रशेखर बोराडे, धनेश बटाविया तसेच सह्याद्री हॉस्पिटलचे युनिट हेड संजय चावला. सुयोग कुलकर्णी, रोहन परदेशी यांनी मोलाचे योगदान दिले.
इन्फो
दोन दिवसात ३०१ जणांचे रक्तदान
खुटवडनगरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने आयोजित शिबिरात ३८ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आल्या. या रक्तसंकलनासाठी संदीप चौधरी, विनय शौचे, अरुण कुलकर्णी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले. तर एकलहरेनजीक चांदगिरीला २८ रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या. त्यामुळे शुक्रवारच्या १६८ तर शनिवारच्या १३१ याप्रमाणे दोन दिवसात एकूण ३०१ रक्तपिशव्या संकलित झाल्या आहेत. राज्यात कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून ‘लोकमत’च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून राज्यभरातील रक्तसाठ्यात भर घालण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
इन्फो
एकलहरेत २६ जणांचे रक्तदान
एकलहरे : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमास तालुक्याच्या पूर्व भागातील चांदगिरी गावापासून सुरुवात झाली. शनिवारी (३ जुलै) चांदगिरी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने मारुती मंदिर सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. माजी सरपंच रमेश आप्पा कटाळे, किरण कटाळे यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी मुख्याध्यापक दत्तू कारवाळ, सरपंच महेंद्र हांडगे, उपसरपंच रामहरी कटाळे, पोलीस पाटील लखन कटाळे, ग्रामपंचायत सदस्य अनिता बागुल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात २६ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. काही नागरीकांनी नुकतीच कोव्हिडची लस घेतली असल्याने त्यांना रक्तदान करता आले नाही. या शिबिरासाठी अर्पण रक्तपेढीचे सहकार्य लाभले.
इन्फो
सुटीवर आलेल्या जवानाने केले रक्तदान
या रक्तदान शिबिराचे विशेष म्हणजे लष्करात पश्चिम बंगालमध्ये कार्यरत असलेले जवान गणेश मोरे हे सुट्टीवर आपल्या गावी चांदगिरी येथे आले आहेत. लोकमततर्फे घेण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराची माहिती त्यांना मिळाल्याने त्यांनीही रक्तदान केले. घरी असतानाही देशबांधवांप्रति आपले कर्तव्य बजावत गावकऱ्यांसमोर एक आदर्श घालून दिला.
इन्फो
रविवारी ५ जागांवर रक्तदान
‘लोकमत रक्ताचं नातं’ अभियानाच्या तिसऱ्या दिवशी बालगणेश फाउंडेशनतर्फे बालगणेश उद्यान सभागृह, पंडित कॉलनी, शिवसेना भवन, शालिमार, दिव्य फाउंडेशनतर्फे सह्याद्री हॉस्पिटल, तसेच कालिका मंदिरासमोरील श्री कालिका काॅम्प्लेक्स आणि शहराच्या परिघातील कोटमगाव अशा ५ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
फोटो (०३ चांदगिरी)
1) चांदगिरी येथे स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन करताना माजी सरपंच रमेश आप्पा कटाळे, किरण कटाळ. समवेत मुख्याध्यापक दत्तू कारवाळ व ग्रामपंचायत सदस्य.
----
फोटो (०३ जवान मोरे)
२) सुट्टीवर आलेले जवान गणेश मोरे रक्तदान करताना.
--------
फोटो (पीएचजेएन ९९ )
३) दिव्य फाउंडेशनच्या वतीने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये झालेल्या शिबिरात रक्तदान करणारे नागरिक.
----------
फोटो -( ०३आरएसएस )
४) खुटवडनगरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे झालेल्या शिबिरात रक्तदान करताना नागरिक.
------