शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
3
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
4
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
5
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
6
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
7
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
8
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
9
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
10
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
11
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
12
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
13
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
14
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
15
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
16
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
17
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
18
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
19
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?

शहरातील बाधित संख्या पाचशेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:06 IST

नाशिक : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, जुन्या नाशकातील नाईकवाडी पुरा हा तर हॉटस्पॉट झाला आहे. या भागात सुमारे २५ बाधित आढळले आहेत, तर मंगळवारी (दि.९) एका बाधिताचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २२ झाली आहे. तर दिवसभरात २१ बाधित आढळल्याने शहरातील रुग्णसंख्या ४८० झाली आहे.

नाशिक : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, जुन्या नाशकातील नाईकवाडी पुरा हा तर हॉटस्पॉट झाला आहे. या भागात सुमारे २५ बाधित आढळले आहेत, तर मंगळवारी (दि.९) एका बाधिताचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २२ झाली आहे. तर दिवसभरात २१ बाधित आढळल्याने शहरातील रुग्णसंख्या ४८० झाली आहे.शहरात गेल्या आठ दिवसांपासून शहरात रोजच कोरोनामुळे मृत्यू होत आहेत. कोरोना बाधितांची संख्या वाढत आहेच, परंतु मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. शहरात सोमवारी (दि.८) पंचवटीतील नाईकवाडी पुरा येथील ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या वृद्धाला रविवारी (दि.७) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. जुन्या नाशिकमधील नाईकवाडी पुरा परिसर हॉटस्पॉट झाला असून, याठिकाणी सुमारे पंचवीस रुग्ण आत्तापर्यंत सापडले आहेत. जुन्या नाशिकमधील अमरधामरोड येथे एक, कादरी चौक येथे एक, आझाद चौक येथे तसेच बागवानपुरा येथे ३० वर्षीय व्यक्तीलादेखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नाग चौकातदेखील दोन जणांना संसर्ग झाला आहे.टाकळीरोड येथे ५१ वर्षांचा इसम, तर सरदार चौकात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे पंचवटीत फुलेनगर परिसरात दोन, द्वारकावरील काठेमळा परिसरात दोन, टाकळीरोडवर चक्रधर कॉलनी परिसरात एक तर अन्यत्र दोन, सातपूर कॉलनीत दोन, जयदीपनगरयेथे एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.----------------------------वडाळा परिसराला दिलासागेल्या दोन दिवसांत वडाळा भागात एकही नवीन रुग्ण आढळला नसून त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे टाकळीरोड, जुने नाशिकसह काही भागांत रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक