शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची ‘स्मार्ट पार्किंग’ही धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:15 IST

शहरातील वाहनतळाचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या ‘स्मार्ट पार्किंग’ योजनाही तांंत्रिक कारणामुळे धोक्यात आली असून, या स्मार्ट पार्किंगचे मुख्य काम करणाऱ्या तांत्रिक अनुभवी कंपनीने या योजनेतून स्वत:ला बाजूला करून घेतले असतानाही महापालिका प्रशासन व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे.

नाशिक : शहरातील वाहनतळाचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या ‘स्मार्ट पार्किंग’ योजनाही तांंत्रिक कारणामुळे धोक्यात आली असून, या स्मार्ट पार्किंगचे मुख्य काम करणाऱ्या तांत्रिक अनुभवी कंपनीने या योजनेतून स्वत:ला बाजूला करून घेतले असतानाही महापालिका प्रशासन व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे.या संदर्भात पत्रकारांशी बोलताना बोरस्ते यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात २८ ठिकाणी आॅनस्ट्रिट आणि पाच ठिकाणी आॅफस्ट्रिट अशा एकूण ३३ ठिकाणी पीपीपी तत्त्वावर पार्किंग स्थळे विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी स्मार्ट कंपनीच्या वतीने निविदाप्रक्रिया काढण्यात आली होती. या निविदाप्रक्रियेत ट्रायजन टेक्नोलॉजी लिमिटेड आणि मिलीनियम सिनर्जी प्रा. लिमिटेड या भागीदार कंपन्यांनी भाग घेतला. त्यात ट्रायजन कंपनी प्रकल्पाची अंमलबजावणी करेल आणि मिलीनियम कंपनी तंत्रज्ञान आणि दर्जेदार साहित्य पुरवेल, असा या दोन कंपन्यामंध्ये करारही झाला होता.मिलीनियम कंपनीने सदरच्या तंत्रज्ञानाला विरोध करूनही ट्रायजन कंपनीने काम सुरू केल्याचे पत्र महापालिका आयुक्त तसेच स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल यांना सहा वेळा दिले. परंतु, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ट्रायजन कंपनीशी असलेली भागीदारी तोडून सदर मिलीनियमने स्मार्ट पार्किंगच्या तंत्रज्ञानात काही गडबड झाल्यास आपण जबाबदार राहणार नाही, असे पत्र महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीला दिले.नवीन निविदा न काढताच काम सुरू‘स्मार्ट पार्किंग’ प्रक्रियेतून ट्रायजन किंवा मिलीनियम कंपनी बाहेर पडल्यास निविदाप्रक्रियाच रद्द करण्याची तरतूद निविदेच्या अटी-शर्तीत करण्यात आली होती तसे करारातही नमूद करण्यात आले आहे. परंतु मिलीनियम कंपनी या कामातून अधिकृत बाहेर पडल्याचे पत्र महापालिकेला व स्मार्ट सिटी कंपनीला देण्यात आल्यावर सदरचे काम रद्द करून नव्याने निविदा मागविण्याची आवश्यकता होती, परंतु महापालिकेने स्वत:च केलेल्या अटी-शर्तींचा भंग करून जुन्याच कंपनीकडून काम पूर्ण करून घेण्याचा धडाका लावला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी