शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

समाज उभारणीत शिक्षक महत्वाचा घटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 17:44 IST

नाशिक : विद्यार्थी घडविण्याबरोबरच समाज घडविण्यासाठी देखील शिक्षकाची भूमिका महत्वाची असते. समाजातील शिक्षकाचे हे योगदान प्रत्यक्षात दिसत नसले तरी त्यांचे योगदान विसरता येणारे नाही.समाजशिक्षणाबरोबरच शासकीय योजनांमध्ये शिक्षक महत्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.प.सा. नाट्यगृह येथे आयोजित जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी त्या ...

ठळक मुद्देशीतल सांगळे : जिल्हा परिषदेच्या गुणवंत शिक्षकांना पुरस्कारांचे वितरणधावपटू वर्षा चौधरी व ताई बामणे यांचा यावेळी सत्कार

नाशिक : विद्यार्थी घडविण्याबरोबरच समाज घडविण्यासाठी देखील शिक्षकाची भूमिका महत्वाची असते. समाजातील शिक्षकाचे हे योगदान प्रत्यक्षात दिसत नसले तरी त्यांचे योगदान विसरता येणारे नाही.समाजशिक्षणाबरोबरच शासकीय योजनांमध्ये शिक्षक महत्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.प.सा. नाट्यगृह येथे आयोजित जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर उपाध्यक्ष नयना गावित, शिक्षण सभापती यतिंद्र पगार, बांधकाम सभापती मनिषा पवार, महिला बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर, समाजकल्याण सुनीता चारोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे उपस्थित होते.ग्रामीण भागात सेवा करणारे शिक्षक नक्कीच आदर्शवत काम करीत असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवितांना शिक्षकांनी आपली मुले म्हणून ज्ञानदान केले पाहिजे असेही सांगळे यांनी यावेळी म्हटले. जिल्हा परिषदेचे अनेक उपक्रम राबविण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची राहिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या पदापर्यंत पोहचविण्यासाठी शिक्षकांचे देखील योगदान असते हे विसरता कामा नये असे सांगून शिक्षकांनी अधिक सक्षमतेने कार्य केले पाहिजे असेही सांगळे यांनी यावेळी सांगितले. शिक्षण सभापती यतिंद्र पगार यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. शिक्षक पुरस्कारांची निवड अतिशय पारदर्शक पद्धतीने झाली असल्याचे सांगत अध्यापनाबरोबरच शिक्षकांचे इतर कामामध्येही महत्वाचे योगदान असल्याचे नमूद केले. गुणवंत शिक्षकांना एक वेतनवाढ देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहिर केले.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी शिक्षकांनी नवीन ज्ञान, कौशल्य आत्मसात करून आपल्यातील क्षमता ओळखून स्वता:ला प्रगल्भ केले पाहिजे असे सांगितले.धावपटू वर्षा चौधरी व ताई बामणे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य नूतन अहेर, डॉ. भारती पवार, महेंद्रसिंग काले, डॉ. सयाजी गायकवाड, यशवंत शिरसाठ, सुरेश कमानकर, दिपक शिरसाठ, रोहिणी गावित, कान्हू गायकवाड, राजेश पाटील, पंडीत अहेर, जगन्नाथ हिरे, निफाड पंचायत समतिी सभापती राजेश पाटील, सदस्य पंडित आहेर, धर्मा देवरे आदि मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद