शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्तीसाठी २३ हजार विद्यार्थ्यांची घरातून प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 15:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोविड-१९ तथा नोवेल कोरोना व्हायरसच्या संकटापासून देशवासीयांची मुक्तता व्हावी, तसेच कोरोनामुक्तीसाठी लढा देणारे डॉक्टर, ...

ठळक मुद्देलढवय्यांचे मानले आभार : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोविड-१९ तथा नोवेल कोरोना व्हायरसच्या संकटापासून देशवासीयांची मुक्तता व्हावी, तसेच कोरोनामुक्तीसाठी लढा देणारे डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, पोलीस यांच्यासह विविध क्षेत्रांतील सेवाव्रती यांच्याप्रती आदर व्यक्त करून त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहर व जिल्ह्यातील शाळांच्या सुमारे २३ हजार विद्यार्थी व शिक्षकांनी आपापल्या घरात सायंकाळी प्रार्थना केली.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी घरातच थांबले पाहिजे, तसेच कोरोनापासून लवकर मुक्ती व्हावी यासाठी डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, पोलीस यांच्यासह विविध क्षेत्रांतील संस्थांच्या माध्यमातून कोरोनाविरोधी लढा देणारे सेवाव्रती यांच्याविषयी आदर व्यक्त करून त्यांचे आभार मानण्यासाठी संस्थेकडून शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा अनोखा उपक्रम राबविल्याची महिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल व सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, संजय लोंढे, उपाध्यक्ष मारुती कुलकर्णी, खजिनदार चार्टड अकाउंटंन्ट अनिल दहिया, सहसचिव मयुर कपाटे, प्रसाद कुलकर्णी यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आॅनलाइन चर्चा झाल्यानंतर शहरी व ग्रामीण भागातील शाळांमधील शाळांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी यांनी कुटुंबासमवेत शुक्रवारी (दि.२४) सायंप्रार्थना घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शाळेतील वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्हॉट््सग्रुपद्वारे माहिती दिली. त्यानुसार संस्थेच्या नाशिक, नाशिकरोड, सिन्नर, इगतपुरी व नांदगाव तालुक्यातील शाळांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व संस्थेचे पदाधिकारी यांनी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता एकाचवेळी आपापल्या कुटुंबासमवेत सायंप्रार्थना करताना ओमकार, गायत्री मंत्र, श्री गणपती स्तोत्र, श्री गणपती अर्थवशीर्ष, श्री मारुती स्तोत्र, श्री रामरक्षा स्तोत्र, पसायदान यापैकी प्रार्थना केली.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या