नाशिक: स्रेल पटेल आणि विश्वराजसिंग जडेजा यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्र ने एक बाद २३२ धावा अशी मजल मारली. पटेल ७९ तर जडेजा ८९ धावांवर खेळत आहेत.गोल्फ क्लब मैदानावर सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सौराष्ट्र ने महाराष्ट्र विरूद्ध दमदार सुरुवात करून मोठी धावसंख्या उभारण्याकडे वाटचाल सुरू केली असून दोघांचीही शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. सलामीवर हार्विक देसाई बाद ५५ धावांवर बाद झाल्यानंतर स्रेल आणि विश्वराजसिंग यांनी चौफेर टोलेबाजी करीत दोनशेच्यावर धावांचा पल्ला गाठला. नाणेफेक जिंकून महाराष्ट्र ने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सकाळच्या सत्रात खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल ठरेल असे वाटत असतांना सौराष्ट्र च्या फलंदांजांपुढे महाराष्ट्र चा एकही गोलंदात प्रभाव पाडू शकला नाही. सलामी जोडीच्या शतकी भागिदारीला दोन धावा कमी असतांनाच देसाई ५५ धावांवर बाद झाला.महाराष्ट्र कडून संकलेचाला एक गडी बाद केला. इतर गोलंदाज फारसा प्रभाव पाडू शकले नाही.
सौराष्ट्रची दमदार सुरूवात; जडेजा,पटेलची शतकाडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 15:52 IST