शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब आणि जातीत अडकलेल्या सत्तेला लावणार सुरुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 19:08 IST

नाशिक : कुटुंब आणि जातींमध्ये अडकलेल्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी बहुजन वंचित आघाडी काम करणार असून, खुंटलेल्या लोकशाही आणि विकासाच्या ...

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता शिबिरात प्रतिपादन

नाशिक : कुटुंब आणि जातींमध्ये अडकलेल्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी बहुजन वंचित आघाडी काम करणार असून, खुंटलेल्या लोकशाही आणि विकासाच्या विचाराला चालना देण्यासाठीच राजकीय निर्णय क्षमता निर्माण करणे अपेक्षित आहे. सत्तेचे लोकशाहीकरण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आताच कामाला लागले पाहिजे, असे प्रतिपादन बहुजन विकास वंचित आघाडीचे प्रणेते आणि भारिपचे राष्टÑीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.शहरातील औरंगाबादकर सभागृहात आयोजित बहुजन वंचित विकास आघाडीच्या उत्तर महाराष्टÑ पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारिपचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, शिवाजी ढेपले, अण्णासाहेब सूर्यवंशी, बाजीराव बोडके, जावेद मुन्शी, अ‍ॅड. अरुण जाधव, प्रभात सोनवणे, प्रा. किसन चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी आंबेडकर म्हणाले, आगामी निवडणुका या वंचित बहुजन विकास आघाडीच्या बॅनरखालीच लढविल्या जातील. सत्ताकारणासाठीचे सकारात्मक चित्र आघाडीपुढे असले तरी सत्तेपेक्षाही आघाडीच्या माध्यमातून निर्णयक्षमता निर्माण करणारी ताकद गावपातळीपासून निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आघाडीबरोबर येणाºया अलुतेदार-बलुतेदारांनाबरोबर घेऊन जातांना कटुता टाळून संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर मतभेद होता कामा नये, असेही आंबेडकर म्हणाले.वंचित आघाडीचे संघटन उभे करण्यासाठी निर्णय घेणारे पदाधिकारी, कार्यकर्ते निर्माण करण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवरच पार पाडावी लागणार असून, यासाठी व्यापक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणाºया कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली पाहिजे. खुंटलेल्या राजकीय विचारांना मोकळे करण्याची जबाबदारी आता आघाडीच्या कार्यर्त्यांची असल्याचेही ते म्हणाले. बदल हा आता लगेचच घडेल असे नाही, परंतु पुढील निवडणुकीच्या वेळी मात्र नक्कीच परिवर्तन झालेले असेल असे आंबेडकर म्हणाले. यावेळी प्रभात सोनवणे आणि शिवाजी ढेपले यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.प्रारंभी विभागातून आलेल्या विविध समाजाच्या आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना समाजाला प्रतिनिधित्व देण्याबरोबरच वंचित आघाडीसोबत असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष पवन पवार यांनी आभार मानले.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारण