शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

३३ वर्षानंतर नाशिकमध्ये रंगणार राज्य अजिंक्यपद कबड्डीचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 17:57 IST

१९८५ साली मनमाड येथे वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेनंतर नाशिक जिल्ह्यात तब्बल ३३ वर्षानंतर वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नामांकीत खेळाडू सहभागी होणार असून यातूनच राज्याच्या संघाची निवड करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देराज्यस्तरीय स्पर्धा : महिला,पुरूषांचे २५ संघ होणार सहभागी

नाशिक : १९८५ साली मनमाड येथे वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेनंतर नाशिक जिल्ह्यात तब्बल ३३ वर्षानंतर वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नामांकीत खेळाडू सहभागी होणार असून यातूनच राज्याच्या संघाची निवड करण्यात येणार आहे.महाराष्टÑ राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने सिन्नरच्या सह्याद्री युवा मंचच्यावतीने सिन्नरमध्ये ६६ व्या वरिष्ठ पुरूष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत सिन्नर येथील आडवा फाटा मैदानावर या स्पर्धेचा थरार रंगणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे व सह्याद्री युवा मंचचे अध्यक्ष उदय सांगळे यांनी दिली.या स्पर्धेज राज्यातील महिलांचे आणि पुरूषांचे प्रत्येकी २५ संघ सहभागी होणार असून सुमारे ६०० खेळाडूंच्या सहभागाने स्पर्धेची चुरस वाढणार आहे. ५० प्रशिक्षक, ५० संघ व्यवस्थापक, १०० पंच, विविध जिल्ह्यातील संघटनांचे व राज्य संघटनेचे १०० पदाधिकारी तसेच १०० स्वयंसेवक असे एकुण १००० व्यक्त या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.सिन्नर येथे कबड्डीची आधुनिक क्रीडानगरी उभारण्यात येणार आहे. या नगरीत ८००० क्षमतेची प्रेक्षक गॅलरी उभरण्यात येणार आहे. सहा मैदानांवर सायंकाळी प्रकाशझोतात सामने खेळविण्यात येणार असून प्रथम साखळी तर नंतर बाद पद्धतीने सामने खेळविले जाणार आहेत.या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, माजी आमदार जयंत जाधव, सह्याद्री मंडळाचे उदय सांगळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड आदि उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रशांत भाबड यांनी केले.--इन्फो--या अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत राष्टÑीय, आंतरराष्टÑीय तथा प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळले नामांकीत खेळाडू सहभागी होणार असून नाशिक जिल्ह्यातील कबड्डीप्रमींना या आंतरराष्टÑीय खेळाडंूचा खेळ पाहाण्याची संधी मिळणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद