शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

प्रवेश नाकाल्याने विद्यार्थी कनिष्ठ लिपिक परीक्षेस मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 18:19 IST

इंदिरानगर : कोषागार विभागाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठी रविवारी (दि. ३) गुरू गोविंदसिंह केंद्रावरील आॅनलाइन परीक्षेसाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांना परीक्षा ...

ठळक मुद्देकाही काळ गोंधळ : कोषागार विभागाच्या परीक्षेतील प्रकार

इंदिरानगर : कोषागार विभागाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठी रविवारी (दि. ३) गुरू गोविंदसिंह केंद्रावरील आॅनलाइन परीक्षेसाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात न सोडण्यात आल्याने काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचे निवेदन पोलिसांकडे सादर केले.इंदिरानगर येथील गुरू गोविंदसिंह महाविद्यालयात वित्त विभागाच्या कोषागार विभागाची कनिष्ठ लिपिक पदासाठी आॅनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी विभागातील विद्यार्थी हजर झाले होते. सकाळी जवळपास २० ते २५ विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात सोडण्याची विनंती गेटवरील कर्मचाऱ्यांना केली, मात्र सुरक्षारक्षकांनी विद्यार्थ्यांना वेळेचे कारण देत केंद्रात सोडण्यास नकार दिला. यावेळी परीक्षा केंद्राशी संबंधित अधिकारी समोर न आल्याने विद्यार्थ्यांचा संयम सुटला आणि त्यातील काहींनी परीक्षा केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना परीक्षेसाठी संगणकदेखील मिळाला नाही. या गोंधळामुळे संबंधितांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीसे वातावरण निवळले, मात्र या विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली. त्यांना परीक्षा देता न आल्याने त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जाऊन आपण सकाळी ९.१५ वाजता परीक्षा केंद्रावर हजर असतानाही सुरक्षारक्षकांनी केंद्रात सोडले नसल्याचा दावा निवेदनात केला आहे. निवेदनावर विवेक माळी, राजेंद्र कातकडे, मंजुषा शिरसाठ, मनोज पगार, विशाल मोगल, माधुरी गायकवाड, शीतल घुगे, अर्जुन श्रीवास्तव यांसह अनेक विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

टॅग्स :Nashikनाशिकexamपरीक्षा