शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आता शासनाच्या नव्हे, तर वारकऱ्यांच्या श्रमातून जीर्णोद्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 16:06 IST

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिराच्या प्रस्तावित बांधकामास शासनाकडून कोणताही निधी न मिळाल्याने आता शासनाकडे विनंती न करता वारकऱ्यांच्या श्रमातूनच संजीवन समाधी मंदिराचे बांधकाम पूर्ण केले जाईल, असा विश्वास जीर्णोद्धार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला. या कामासाठी सुमारे दहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

ठळक मुद्देनिवृत्तिनाथ समाधी मंदिर : संत निवृत्तिनाथ मंदिर जीर्णोद्धार समिती स्थापन हभप महामंडलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिराच्या प्रस्तावित बांधकामास शासनाकडून कोणताही निधी न मिळाल्याने आता शासनाकडे विनंती न करता वारकऱ्यांच्या श्रमातूनच संजीवन समाधी मंदिराचे बांधकाम पूर्ण केले जाईल, असा विश्वास जीर्णोद्धार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला. या कामासाठी सुमारे दहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे.पंचवटीतील श्री काळाराम मंदिर येथे आयोजित बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिराच्या प्रस्तावित बांधकामास विलंब होत असल्याने या कामास गती मिळावी, यासाठी हभप महामंडलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या अध्यक्षतेखाली संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिराची जिल्हास्तरीय जीर्णोद्धार समिती स्थापन करण्यात आली. या समितीने शासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ समाधी मंदिराचा भूमिपूजन सोहळा झाला होता. अनेक महिने उलटूनही तीर्थ विकासासाठी असणारा निधी मिळाला नसल्याचे विश्वस्तांचे म्हणणे आहे.सकल महाराष्टÑाचे दैवत असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबत आता शासन दरबारी कोणत्याही प्रकारच्या अर्ज विनंत्या न करता वारकºयांच्या श्रमातून आणि दानातून मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला. निधी संकलनासाठी नाथांचा एक रथही तयार करण्यात येणार आहे. निधी संकलनासाठी सदर रथ हा जिल्ह्यात फिरविण्यात येणार आहे. कीर्तकारांनी आपल्या कीर्तनातून जीर्णोद्धाराविषयी माहिती देण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला. मंदिराचे सर्व कामकाज हे काळ्या पाषाणात होणार असून सभागृह, प्रवेशद्वार व इतर परिसर सुशोभिकरण करण्यात येणार आहे. बैठकीस पुंडलिक थेटे, निवृत्तिनाथ संस्थानचे अध्यक्ष संजय नाना धोंडगे, पंडित कोल्हे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकkalaram templeकाळाराम मंदीर