शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित सिंचन प्रकल्पांच्या कामांना आता दसऱ्याचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 15:49 IST

सटाणा:बागलाण तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांना अखेर मुहूर्त सापडले आहे. हरणबारी डावा कालवा, हरणबारी उजवा कालवा आणि केळझर चारी क्र मांक आठच्या कामाला येत्या दसर्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात येणार राज्याचे जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव आय.एस.चहल यांनी जाहीर केले आहे.

सटाणा:बागलाण तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांना अखेर मुहूर्त सापडले आहे. हरणबारी डावा कालवा, हरणबारी उजवा कालवा आणि केळझर चारी क्र मांक आठच्या कामाला येत्या दसर्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात येणार राज्याचे जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव आय.एस.चहल यांनी जाहीर केले आहे. बागलाण तालुक्यातील जलसिंचन प्रकल्पांची आढावा बैठक मुंबई येथे खासदार डॉ.सुभाष भामरे ,जलसंपदाचे मुख्य सचिव आय.एस.चहल यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर एक्सप्रेस कालव्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.याच कामावरील साधनसामग्री हरणबारी डाव्या कालव्याच्या कामासाठी वापरण्यात येईल असेही मुख्य सचिव चहल यांनी स्पष्ट केले आहे.हरणबारी उजव्या कालव्यासाठी देखील राज्य सरकार सकारात्मक आहे.मात्र आधीच्या सरकारने हा कालवा मापदंडात बसत नसल्याचा शेरा दिला होता.त्यामुळे तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यास मोठा कालावधी गेला.आता त्याच्यातून मार्ग निघाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोणत्याही सिंचन प्रकल्पासाठी पाच कोटी रु पयांचा निधी खर्च करण्याचा अधिकार प्रधान सचिवांना असून हरणबारी उजव्या कालव्यासाठी आतापर्यंत केवळ ५४ दलघफु पाणीसाठा उपलब्ध असल्याने हरणबारी उजव्या कालव्याच्या अपूर्ण असलेल्या कामापासून (पारनेरपासून) पिहल्या पाच किमीसाठी पाच कोटी व पुढील टप्प्यासाठी पाच कोटी रु पयांचा निधी खास बाब म्हणून लवकरच मंजूर होणार असल्याचेही मुख्य सचिव चहल यांनी सांगितले. केळझर चारी क्र मांक आठचा प्रश्न देखील निकाली असून ३० सप्टेंबर पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरु वात करण्याचे आदेश आपण सबंधित अधिकाºयांना दिले असल्याचे चहल यांनी स्पष्ट केले. या बैठकीस डॉ.शेषराव पाटील,नगराध्यक्ष सुनील मोरे,धुळ्याचे गजेंद्र अंपाळकर, सुरेश भामरे, आदींसह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक