शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आता रोजच्या जेवणात मिळणार काळा अन् लाल भात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 20:31 IST

पेठ : एरवी आपल्या रोजच्या जेवणातील भाताचा रंग हा पांढराच असतो. मात्र यापुढील काळात या ऐवजी काळा आणि लाल भात आपल्या ताटासमोर आला तर आश्चर्य वाटू नये. कारण पेठ तालुक्यात प्रथमच अशा प्रकारच्या नव्या भाताच्या प्रजातींचे बीजोत्पादन करण्याचा प्रायोगिक प्रयोग सुरू केला आहे.

ठळक मुद्देसुधारित बीजोत्पादन : पेठ तालुक्यात प्रायोगिक तत्वावर प्रारंभ

 

रामदास शिंदेलोकमत न्यूज नेटवर्कपेठ : एरवी आपल्या रोजच्या जेवणातील भाताचा रंग हा पांढराच असतो. मात्र यापुढील काळात या ऐवजी काळा आणि लाल भात आपल्या ताटासमोर आला तर आश्चर्य वाटू नये. कारण पेठ तालुक्यात प्रथमच अशा प्रकारच्या नव्या भाताच्या प्रजातींचे बीजोत्पादन करण्याचा प्रायोगिक प्रयोग सुरू केला आहे.पेठ तालुक्यातील जवळपास १०० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वनराज शेतकरी गटाची स्थापना करु न गट शेतीला प्राधान्य दिले. मिश्रफळबागेसह विविध तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यात येत आहेत. शेतीला पूरक व्यवसाय करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. या वर्षी पेठ तालुक्यात रत्नागिरी( ब्लॅक राईस), रत्नागिरी (रेड राईस) आणि रत्नागिरी-६ अशा तीन प्रकारच्या भाताचे बीजोत्पादन करण्यात येणार आहे. कृषी विभाग व आत्मा प्रकल्प यांच्या सहकार्याने तालुक्यातील शेतकर्यांना मागणी प्रमाणे प्रत्येकी एक एकर साठी भात बियाणाचा पुरवठा करण्यात येणार असून अशा प्रकारच्या भात बीजोत्पादनाचा पहिलाच प्रयोग राबवण्यात येत असल्याने शेतकºयांमध्येही या नवीन भाताच्या उत्पादनाबाबत उत्सूकता आहे.पेठ तालुका तसा भात पिकासाठी पोषक असून कृषी विभाग व आत्मा प्रकल्प यांच्या मार्गदर्शनाने वनराज तर्फे नवीन तीन प्रकारच्या भाताचे बीजोत्पादन करण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकºयांनी या प्रक्रि या उपक्र मात सहभागी व्हावे.- यशवंत गावंडे, शेतकरी, गावंधपाडा ता. पेठ.