शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आता स्वाइन फ्लूचाही रुग्ण

By admin | Updated: July 5, 2014 00:19 IST

आता स्वाइन फ्लूचाही रुग्ण

नाशिक : शहरात पूर्व आणि पंचवटी विभागापाठोपाठ नाशिकरोड विभागातही डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे एका महिलेस स्वाइन फ्लू झाल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पावसाळा सुरू होत नाही तोच विविध रोगांची लागण होण्यास सुरुवात झाल्याने नगरसेवकांनीही पालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.नाशिकरोड येथील जेलरोड भागात ओमनगर येथे राहणाऱ्या सुधाकर वरखेडे (वय ५५) आणि त्यांचा नातू आयुष सचिन वरखेडे (वय ८) या दोघांना डेंग्यू झाल्याचे खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार घोषित करण्यात आले आहे. दोघेही खासगी रुग्णालयात आठ दिवसांपासून उपचार घेत असून, गुरुवारी सायंकाळी या दोघांना डेंग्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे जेलरोडवर राहणाऱ्या एका महिलेस स्वाइन फ्लू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सदर महिलेवर एका खासगी रुग्णालयात स्वतंत्र कक्षात उपचार केले जात आहेत, अशी माहिती या भागाचे शिवसेना नगरसेवक शैलेश ढगे यांनी दिली. यासंदर्भात पालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे आणि सहायक आरोग्याधिकारी डॉ. सचिन हिरे यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. तथापि, पालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. ज्या ओमनगर परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळले तेथे कोणत्याही प्रकारे अन्य नागरिकांची तपासणी किंवा डास निर्मूलन पथकामार्फत धुराळणी आणि तत्सम कार्यवाही झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.तीन दिवसांपूर्वी उपमहापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रभागात अशोका मार्ग येथे डेंग्यूचे सहा संशयित रुग्ण आढळले. पाठोपाठ पंचवटीतही एक रुग्ण आढळला. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या दोन्ही विभागांमध्ये डास निर्मूलन मोहीम, पाण्याचे कंटेनर तपासणी आणि डासांची उत्पत्तीस्थाने आढळल्यास ती नष्ट करणे अशा प्रकारची विविध कामे हाती घेतली आहेत. असे असताना डेंग्यूची लागण आता नाशिकरोड विभागापर्यंत पोहोचल्याने नागरिक हवालदिल झाले असून, कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)