शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

आता पालिकेत स्वतंत्र सेल

By admin | Updated: May 8, 2016 23:15 IST

पालिकेचे धोरण : वाहतूक, गोदावरी, स्मार्ट सिटीसाठी विशेष विभाग

नाशिक : महापालिकेशी संबंधित विविध जबाबदाऱ्यांचे वहन द्रुतगतीने व्हावे यासाठी विषयानुरूप स्वतंत्र विभाग सुरू करण्याचे धोरण प्रशासनाने स्वीकारले आहे. शहर वाहतुकीपासून विकास आराखड्याच्या अंमलबजावणीपर्यंत आणि गोदावरी संवर्धनापासून मुकणे धरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र सेल सुरू करण्यात येणार आहे. त्यादृष्टीनेच अधिकारी आणि अभियंत्यांच्या बदलीचे नियोजन करण्यात येत आहे.महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी ही माहिती दिली. शहर आणि महापालिकेचे कामकाज करताना त्यासाठी सर्व कामे त्याच त्या अधिकाऱ्यांकडून करवून घेताना अन्य जबाबदाऱ्यांमुळे अडचणी येतात. त्यामुळे त्या त्या विषयांना न्याय मिळत नाही, अशी अवस्था आहे. त्या पार्श्वभूमीवर आता काही महत्त्वाच्या विषयांसाठी स्वतंत्र सेल सुरू करण्यात येणार आहे. शहराची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने वाहतूक सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील वाहतुकीच्या समस्यांवर कायमस्वरूपी लक्ष ठेवून नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र अभियंते नियुक्त केले जातील. ज्यांच्याकडे केवळ याच विभागाचे काम असेल अतिरिक्त जबाबदारी नसेल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. अशाच प्रकारे शहर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठीदेखील सेल असणार आहे. सध्या नगररचना विभागात विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यापेक्षा बांधकाम परवानग्या देणाऱ्यावरच भर दिला जातो. त्यामुळे वीस वर्षांपूर्वीच्या मंजूर आराखड्यातील आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी आजही कामे सुरूच आहेत. तसे होऊ नये आणि नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर किमान रस्ते तातडीने ताब्यात घेता यावे, यासाठी सेलची निर्मिती करण्यात येणार आहे. मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना ही २६० कोटी रुपयांची आहे. महापालिकेला दरवर्षी अंदाजपत्रकात भांडवली कामांसाठी जितका निधी मिळतो, तितक्या रकमेची ही योजना असल्याने स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहे. अशाच प्रकारे नदीसंवर्धनासाठीही विभाग सुरू होणार आहे.