शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

...आता काश्मीरमध्ये देशभक्ती होईल बळकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:37 IST

कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरला मिळालेले विशेषाधिकार हे केवळ कागदोपत्री होते. भारताचे ते आविभाज्य अंग असूनदेखील नसल्यासारखे होते. त्या राज्याचा स्वतंत्र राष्टÑध्वज होता, यामुळे भारताविषयीचे प्रेम तेथील जनतेत वृद्धिंगत होण्यास अडथळा निर्माण होत होता. कलम ३७० हटविण्यात आल्याने भारतीय देशप्रेम, राष्टÑभक्तीची भावना काश्मीरमध्ये अधिक बळकट होईल आणि भारतासोबत काश्मीरच्या भविष्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होण्यास मदत होईल, असा आशावाद जम्मू-काश्मीर अभ्यास केंद्राचे संचालक अरुणकुमार यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देअरुणकुमार : ३७० हटविल्याने भारतीय संविधानाचा काश्मीर प्रवेश

नाशिक : कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरला मिळालेले विशेषाधिकार हे केवळ कागदोपत्री होते. भारताचे ते आविभाज्य अंग असूनदेखील नसल्यासारखे होते. त्या राज्याचा स्वतंत्र राष्टÑध्वज होता, यामुळे भारताविषयीचे प्रेम तेथील जनतेत वृद्धिंगत होण्यास अडथळा निर्माण होत होता. कलम ३७० हटविण्यात आल्याने भारतीय देशप्रेम, राष्टÑभक्तीची भावना काश्मीरमध्ये अधिक बळकट होईल आणि भारतासोबत काश्मीरच्या भविष्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होण्यास मदत होईल, असा आशावाद जम्मू-काश्मीर अभ्यास केंद्राचे संचालक अरुणकुमार यांनी व्यक्त केला.सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित भोसला मिलिटरी कॉलेज संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने रविवारी (दि.१५) गंगापूररोडवरील कुर्तकोटी सभागृहात ‘जम्मू-काश्मीर आणि लडाख : ५ आॅगस्ट २०१९ पूर्वी आणि नंतर’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी अरुणकुमार प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल तथा सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय शेकटकर, कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, कॅप्टन डॉ. श्रीपाद नरवणे व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी अरुणकुमार म्हणाले, काश्मीरच्या संघर्षात मागील ७२ वर्षांमध्ये अनेक शूरवीरांनी हौतात्म्य पत्करले आहे. त्यामुळे काश्मीर भारताच्या नकाशात टिकून आहे. काश्मीरचे महत्त्व लडाख, पाकव्याप्त काश्मीर आणि चीन व्याप्त प्रदेशामुळे अधिक आहे. कलम ३७० हा काश्मीरच्या विकासमार्गातील आणि तेथील जनतेला त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी मोठा अडसर होता, असेही अरुणकुमार यावेळी म्हणाले.व्यवस्था सुधारणारजम्मू-काश्मीरमध्ये ७२ वर्षांत ढासळलेली व्यवस्था सुधारण्याचा मार्ग ५ आॅगस्ट २०१९ नंतर या सरकारने खुला केला. त्यामुळे आता भविष्यात काश्मीरमध्ये वाईट काही नाही, तर चांगलेच घडणार असून तेथील जनतेच्या मनात आत्मविश्वास वाढीस लागून भारताविषयीची अस्मिता अधिक मजबूत होईल, असे अरुणकुमार यावेळी म्हणाले. कोणत्याही राष्टÑाची उभारणी व निर्मिती ही देशप्रेमाच्या भावनेने होत असते, हे आपण विसरून चालणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकPoliticsराजकारण