शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अब दिल्ली दूर नही...! : नाशिककरांना थेट विमानसेवा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:56 IST

देशाच्या राजधानीत जाण्यासाठी नाशिककरांना थेट विमानसेवा उपलब्ध झाली असून, दोन तासात तेथे पोहोचता येणार असल्याने ‘अब दिल्ली दूर नही’ अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकच्या ओझर विमानतळावरून ही सेवा सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला.

नाशिक : देशाच्या राजधानीत जाण्यासाठी नाशिककरांना थेट विमानसेवा उपलब्ध झाली असून, दोन तासात तेथे पोहोचता येणार असल्याने ‘अब दिल्ली दूर नही’ अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकच्या ओझर विमानतळावरून ही सेवा सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला.  केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत प्रादेशिक हवाई सेवा जोडणीचा भाग म्हणून नाशिक ते मुंबई आणि नाशिक ते पुणे अशी विमानसेवा सुरू करण्यात आली होती. दुसºया टप्प्यात देशातील विविध भागांना जोडण्यासाठी सहा विमान कंपन्या दिल्ली, गोवा, हैदराबाद, गाझीयाबाद, अहमदाबाद अशा सेवा सुरू करणार आहेत. जेट एअरवेजने ही सेवा सर्वप्रथम सुरू करून आघाडी घेतली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर नाशिककरांनी वेळेची बचत होण्यासाठी दिल्ली विमानसेवेला प्राधान्य दिले होते. शुक्रवारी (दि. १५) ओझर विमानतळावर या विमानसेवेचा शुभारंभ खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यवा कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. नाशिकच्या विमानसेवेमुळे जिल्ह्णाच्या विकासाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, त्यामुळे ही सेवा सुरू राहण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असे यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी सांगितले. औद्योगिक, कृषी उत्पादने आणि धार्मिक शहर म्हणून नाशिक शहराचे महत्त्व असून, सात ते आठ जिल्ह्णांच्या दृष्टीने नाशिक हे मध्यवर्ती शहर आहे. त्यामुळे विमानसेवेची गरज ही सर्व घटकांसाठी उपयुक्त ठरेल तसेच नाशिकच्या विकासालाही यामुळे चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.  निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनीदेखील विमानसेवा सुरू होत असल्याने नाशिकच्या उद्योग क्षेत्राला चालना मिळेल. तसेच यापूर्वीच्या विमानसेवेचा विचार करता ही सेवा निरंतर सुरू ठेवण्यासाठी उद्योग क्षेत्र प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले. कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांनी नाशिकहून सुरू होणारी नाशिक-दिल्ली विमानसेवा ही नाशिककरांंना देशातील विविध शहरांना आणि जगाला जोडणारी असून, येथील प्रतिसाद आणि अन्य मार्गांवरील सेवा सुरू करणे किंवा मुंबईच्या विमानतळाला पर्यायी म्हणून नाशिकच्या विमानतळाचा पार्किंगसाठी वापर, मालवाहतूक या सर्वांबाबतच सकारात्मक विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.  यावेळी चेक इन काउंटरचेही उद्घाटन करण्यात आले. सदरची सेवा आठवड्यातून तीन दिवस चालणार आहे. उडान योजनेअंतर्गत चाळीस तिकिटे शासन दरानुसार असणार आहेत.प्रवाशांचा चांगला प्रतिसादनाशिक ते दिल्ली या विमानसेवेला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला असून, दिल्लीहून १२६ प्रवासी नाशिकला आले, तर नाशिकमधून १२५ प्रवासी दिल्लीसाठी रवाना झाले. विमानसेवेचा शुक्रवारी पहिलाच दिवस असल्याने चेक इन काउंटरवर गुलाबपुष्प देऊन प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. प्रशांत चौरसीया हे या विमानाचे पहिले प्रवासी ठरले.नाशिक मधून ४ टन शेतमाल विदेशात निर्यातया विमानसेवेच्या माध्यमातून नाशिक मधील चार टन शेतमाल विदेशात पाठविण्यात आला आहे. यात तीन टन आंबे तर १ टन भाजीपाल्याचा समावेश आहे. लंडन येथे आंबे तर दुबई येथे भाजीपाला पाठविण्यात आला. 

टॅग्स :Airportविमानतळ