शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

...आता मशिदींमध्येही प्रवेशबंदचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:16 IST

शहरातील बहुतांश मुख्य दर्ग्यांचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी ३१ मार्चपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर संबंधित विश्वस्तांकडून बंद करण्यात आले. यानंतर आता शहरातील सुमारे ५० पेक्षा अधिक मशिदीदेखील ‘लॉकडाउन’ करण्याचा निर्णय शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी मौलवींच्या बैठकीत घेतला. यामुळे आता मशिदींमध्ये दिवसाच्या तीन प्रहरांमध्ये पाचवेळा होणाऱ्या नमाजपठणाला केवळ चार ते सहा लोक (मौलवींसह) हजर राहतील, असे जाहीर केले आहे.

ठळक मुद्देलढा कोरोनाशी : मौलवींसह पाच लोकांना परवानगी

नाशिक : शहरातील बहुतांश मुख्य दर्ग्यांचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी ३१ मार्चपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर संबंधित विश्वस्तांकडून बंद करण्यात आले. यानंतर आता शहरातील सुमारे ५० पेक्षा अधिक मशिदीदेखील ‘लॉकडाउन’ करण्याचा निर्णय शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी मौलवींच्या बैठकीत घेतला. यामुळे आता मशिदींमध्ये दिवसाच्या तीन प्रहरांमध्ये पाचवेळा होणाऱ्या नमाजपठणाला केवळ चार ते सहा लोक (मौलवींसह) हजर राहतील, असे जाहीर केले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर आता घरातून कोणही अनावश्यकरीत्या बाहेर पडणार नाही. यामुळे शहरातील सर्वच मशिदींमध्ये नमाजपठणासाठी नागरिकांनी न जाता आपापल्या घरीच नमाजपठण करावे, असे आवाहन खतीब यांनी केले आहे. पोलीस प्रशासनाला नागरिकांनी संपूर्णत: सहकार्य करावे, कोणीही घराबाहेर पडू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारचे सर्व आदेश हे जनतेच्या आरोग्याच्या हिताचे असल्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगून आपापल्या घरातच थांबावे, असेही खतिब यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे. शहरातील जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड, वडाळारोड, देवळाली कॅम्प, विहितगाव, सातपूर या सर्व भागांमधील मशिदींमध्येही नमाज पठणासाठी नागरिकांना जाता येणार नाही. नागरिकांनी नमाजपठणाकरिता घराबाहेर पडू नये, पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. कोरोना आजार हा अत्यंत जीवघेणा असून, या आजारापासून स्वत:सह आपले कुटुंब व परिसराला सुरक्षित ठेवण्याकरिता सर्व शहरासह उपनगरांमधील नागरिकांनी आपापल्या घरांमध्येच थांबणे गरजेचे आहे.नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोरोना आजाराशी सर्वांना एकजुटीने लढा द्यावा लागणार आहे. आपापल्या घरातच थांबून धार्मिक पारंपरिक पद्धतीने अल्लाहची उपासना (इबादत) करावी. या आजाराचे आलेले संकट लवकरात लवकर टळावे, यासाठी प्रार्थना (दुवा) करावी. धर्मग्रंथ कुराणचे अधिकाधिक पठण करण्यास प्राधान्य द्यावे. कुटुंबाची खास काळजी घ्यावी.- हिसामुद्दीन अशरफी,शहर-ए-खतीब

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या