शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
4
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
5
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
6
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
7
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
8
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
9
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
10
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
11
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
12
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
13
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
14
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
15
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
16
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
17
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
18
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
19
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...

आता प्लाझ्माचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST

नाशिक : कोरोनाने थैमान घातलेले असताना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष आणि काळ्याबाजाराचा सामना करावा लागत आहे. ...

नाशिक : कोरोनाने थैमान घातलेले असताना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष आणि काळ्याबाजाराचा सामना करावा लागत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविरच्या अनुपलब्धतेमुळे त्यांचा काळाबाजार सुरूच असल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाने सर्व रक्तपेढ्यांना प्लाझ्मा ५५०० रुपयांना उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेले असतानाही काही ठिकाणी प्लाझ्मा ८५०० तर काही ठिकाणी १० ते ११ हजारांच्या दराने मिळत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

ज्या गंभीर रुग्णांना कोरोनावरील नियमित गोळ्या किंवा रेमडेसिविरनेदेखील फारसा फरक पडलेला नाही, अशा रुग्णांनाच सामान्यपणे प्लाझ्मा दिला जाताे. तो प्लाझ्मादेखील ज्या व्यक्तीला कोरोना होऊन एक-दीड महिन्यांहून अधिक कालावधी झालेला असेल, अशा दात्यांकडून घेतला जातो. कोविड १९ विषाणूवर मात करून आजारमुक्त झालेल्यांच्या शरीरात विकसित होणाऱ्या रोगप्रतिकारकशक्तीचा आधार घेऊन या विषाणूशी झुंजणाऱ्यांना बरे करता येते. या दात्यांकडून मिळालेल्या रक्ताच्या एचआयव्हीसह सर्व प्रकारच्या चाचण्या करून मगच तो प्लाझ्मा बाधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना दिला जातो. त्यामुळेच त्या प्लाझ्माच्या एका बॅगचा दर ५५०० रुपये निर्धारित करण्यात आला आहे.

इन्फो

प्लाझ्मातही नफेखोरी

कोरोनावर मात केलेल्या व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीचा आधार घेऊन या विषाणूशी झुंजणाऱ्यांना बरे करता येते. त्यासाठी करोनामुक्त झालेल्यांच्या रक्त घटकातील प्लाझ्मा वेगळे करून त्याचे आजारी माणसाला रक्तसंक्रमण केले, तर कोरोनाची तीव्रता कमी करता येते. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांसाठी प्लाझ्मा आणा म्हटल्यावर बाधिताचे कुटुंबीय मिळेल तिकडे धाव घेतात. मात्र, अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीची निकड, त्याची तातडी बघून त्याच्याकडून दुपटीहून अधिक दराने पैसे उकळले जात आहेत.

इन्फो

प्लाझ्माची उपयुक्तता

कोरोनाची बाधा होऊन उपचारांनी बरे झालेल्यांच्या शरीरात विषाणूशी लढणाऱ्या सैनिक पेशी विकसित होतात. विषाणू बाधा झाल्यानंतर २८ दिवसांच्या कालावधीत या अंटिबॉडिज विकसित होतात. कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरातील हाच घटक म्हणजे 'कन्व्हलसन्ट प्लाझ्मा.' हा प्लाझ्मा आजारी रुग्णाला संक्रमित केल्यास रुग्णाला विषाणूशी झुंजण्यास मदत होते व रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी करता येतो.

इन्फो

कोरोनामुक्तांच्या तुलनेत दान अत्यल्प

जिल्ह्यात सध्या तब्बल दोन लाख ६० हजारांहून अधिक नागरिक कोरोनामुक्त आहेत. विशेष म्हणजे केवळ गत दोन महिन्यात कोरोनाबाधित होऊन कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या १ लाखाहून अधिक आहे. त्यातील ५० टक्के नागरिक जरी ६० वर्षांवरील रक्त न देण्याच्या वयातील आहेत, असे मानले तरी उर्वरित ५० हजार नागरिक तरी त्यांचा प्लाझ्मा दान करण्याच्या वयातील आहेत. मात्र, आपला जीव वाचला बास झाले, अशीच बहुतांश नागरिकांची मानसिकता असल्याने रक्तपेढ्यांनादेखील मोठ्या मुश्किलीने प्लाझ्मा दात्यांना तयार करावे लागत आहे.

कोट

माझ्या वडिलांसाठी दोन वेगवेगळ्या रक्तपेढ्यांतून प्लाझ्मा आणावा लागला. त्यात एका रक्तपेढीने शासनाच्या निर्धारित दरातच प्लाझ्मा दिला. मात्र, दुसऱ्या रक्तपेढीने निर्धारित दरापेक्षा दुप्पट रक्कम घेतली. आम्हाला दाता शोधून त्याला जास्त पैसे द्यावे लागल्याचे त्यांचे म्हणणे होते. आम्हालादेखील घाई असल्याने आम्ही तो घेतला.

शशिकांत तिडके, नागरिक