शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

आता ‘कृत्रिम’ जलसंकट, ७ पासून पाणीपुरवठा बंदचा इशारा

By admin | Updated: December 4, 2015 22:44 IST

जीवन प्राधिकरण अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोर्चा, वेतन व भत्ते देण्याची मागणी

नाशिक : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग शासनात विलिनीकरण करून विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन व निर्वाह भत्ते सरकारने करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी (दि.४) सामूहिक रजा टाकण्यात आली.तसेच सकाळी साडेदहा वाजेपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मूक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या धोरणानुसार पाणीपुरवठा व जलनिस्सारण योजनांवरील प्रत्यक्ष खर्चाच्या अनुषंगाने आस्थापना, हत्यारे व अवजारे यांच्या खर्चापोटी १७.५ टक्के इतके ई अ‍ॅन्ड पी शुल्क आकारणे अनिवार्य असून, ते मजीप्राच्या उत्पन्नाशी निगडित आहे. या शुल्कातून मजीप्राच्या कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यापोटीचा खर्च भागविला जातो. कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्याच्या खर्चासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान दिले जात नाही. २२ फेब्रुवारी २०११च्या शासन निर्णयानुसार ई अ‍ॅन्ड पी शुल्क १७.५टक्के ऐवजी ५ ते ९ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व निवृत्तीवेतनाचा खर्च कसा भागवावा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे शासनात विलिनीकरण करून घ्यावे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष समितीने वेगवेगळ्या टप्प्यात आंदोलन सुरू केले आहे. त्याचा पहिला भाग म्हणून २४ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती लावून कामे करणे, ४ डिसेंबरला सामूहिक रजा टाकणे व ७ डिसेंबरपासून मागण्या मान्य होईपर्यंत राज्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे चालविण्यात येणारे पाणीपुरवठा केंद्रे नाईलाजास्तव बंद करणे असा आंदोलनाचा भाग आहे. त्यामुळेच मागण्या मान्य न झाल्यास ७ डिसेंबरपासून ग्रामीण भागातील बहुतांश गावांना पाणीपुरवठा बंद झाल्यास जलसंकट ओढवण्याची चिन्हे आहेत. या निदर्शनात संघर्ष समितीचे पदाधिकारी अजय चौधरी, एस. टी. निकम, आनंद जवंजाळ, कृष्णा झोपे यांच्यासह विभागातील सर्वच कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)